Join us
Daily Top 2Weekly Top 5

सिद्धार्थ जाधव झाला भावुक, माझ्या सिद्धूला तू मला भेटवलंस म्हणत शेअर केला हा फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 15:58 IST

सिद्धूने नुकताच त्याचा एक भावनिक मात्र अतिशय बोलका असा ब्लॅक अँड व्हाईट फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

ठळक मुद्देसिद्धार्थने या फोटोसोबत लिहिले आहे की, माझ्या आजपर्यंतच्या आयुष्यातला सर्वात सुंदर फोटो... मी आणि माझं "बालपण"... आम्ही एकमेकांच्या बाजूला बसलो होतो.. पण... बोललो काहीच नाही... फक्त  अनुभवलं... एकमेकांना...

सिद्धार्थ जाधवने मराठीच नव्हे तर बॉलिवू़डमध्ये देखील खूप चांगल्या भूमिका साकारत त्याची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सिद्धार्थ सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. सिद्धार्थ त्याचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. तसेच तो सोशल मीडियाद्वारे त्याच्या चाहत्यांशी संवाद साधत असतो. 

सिद्धूने नुकताच त्याचा एक भावनिक मात्र अतिशय बोलका असा ब्लॅक अँड व्हाईट फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा फोटो पोस्ट करताना त्याने दिलेले कॅप्शन सगळ्यांचे लक्ष वेधून घेत असून या फोटोने जणू काही त्याला त्याच्या बालपणीच्या सिद्धूची आठवण करून दिल्याचे जाणवत आहे. सगळ्यांनाच माहीत आहे की, सिद्धार्थ अतिशय प्रतिकूल परिस्थितीमधून केवळ मेहनतीच्या जोरावर सुपरस्टार या पदापर्यंत पोहोचला. कदाचित या लहान मुलाने त्याला त्याच संघर्षाच्या दिवसांची आठवण करून दिल्याचा भास त्याच्या या भावनिक पोस्ट मधून होत आहे. सिद्धार्थचा हा फोटो आणि या फोटोचे शीर्षक खूप व्हायरल होत असून फॅन्सने देखील त्याच्या या फोटोवर अनेक कमेंट्स आणि लाइक्स देत पसंतीची पोचपावती दिली आहे. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून 40 हजाराहून अधिक लोकांनी हा फोटो लाईक केला आहे. 

सिद्धार्थने या फोटोसोबत लिहिले आहे की, माझ्या आजपर्यंतच्या आयुष्यातला सर्वात सुंदर फोटो... मी आणि माझं "बालपण"... आम्ही एकमेकांच्या बाजूला बसलो होतो.. पण... बोललो काहीच नाही... फक्त  अनुभवलं... एकमेकांना... तेजस नेरुरकर मित्रा, मी तुझा मनापासून आभारी आहे... आज माझ्या सिद्धूला तू मला भेटवलंस... आई, पप्पा, दादा, पिंकी... LOVE UUU... खूप...

टॅग्स :सिद्धार्थ जाधव