Join us
Daily Top 2Weekly Top 5

सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर पाहताहेत 'या' संधीची वाट, जाणून घ्या याबद्दल

By तेजल गावडे | Updated: September 4, 2021 07:00 IST

सिद्धार्थ आणि मितालीची केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना खूप भावते.

अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे. सिद्धार्थने यावर्षीच्या सुरूवातीला जानेवारी महिन्यात मिताली मयेकरसोबत लग्न केले. ते दोघे सोशल मीडियावर सक्रीय असून ते एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. बऱ्याचदा ते रोमँटिक फोटोंमुळे चर्चेत येत असतात. सिद्धार्थ आणि मितालीची केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना खूप भावते आणि त्यांना त्या दोघांना एकत्र काम करताना पाहायचे आहे. इतकेच नाही तर सिद्धार्थ आणि मितालीदेखील या संधीची वाट पाहत आहेत.

सिद्धार्थ चांदेकरला मिताली सोबत काम करताना कधी दिसणार असे विचारल्यावर तो म्हणाला की, माझी आणि मितालीची एकत्र काम करण्याची खूप इच्छा आहे. पण आम्हाला कुणी कास्ट केल्याशिवाय हे घडणार नाही. त्यामुळे आम्ही या संधीच्या प्रतीक्षेत आहोत. 

सिद्धार्थ चांदेकर आणि पर्ण पेठे यांची मुख्य भूमिका असलेली वेबसीरिज अधांतरी नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. याबद्दल त्याने सांगितले की,  'अधांतरी'ची कथा एका कपलवर आधारीत आहे. लॉंग डिस्टन्समध्ये असलेले कपल जे महिन्यातून दोनदा किंवा जास्तीत जास्त तिनदा भेटत असतात. एकदा ते विकेंडपुरते भेटतात.

लोणावळ्यात आल्यानंतर त्यांना उशीरा समजते की लॉकडाउन जाहीर झाले आहे. त्यामुळे त्यांना निघता येत नाही. आता ते कपल आजपर्यंत कधीच एकत्र राहिलेले नाही आहे ते २१ दिवस एकत्र राहणार आहेत. त्यानंतर काय घडते, हे जाणून घेण्यासाठी ही सीरिज पहा.

टॅग्स :सिद्धार्थ चांदेकरमिताली मयेकरपर्ण पेठे