श्रुती म्हणते, ढोल बजने लगा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2016 16:38 IST
गणेश उत्सवाची चाहूल प्रत्येकाला लागली आहे. ठिकठिकाणी ढोलचा गजर कानी पडत आहे. तरूणांई मोठया उत्साहाने एकत्रित येऊन ढोल वाजविण्याचा ...
श्रुती म्हणते, ढोल बजने लगा
गणेश उत्सवाची चाहूल प्रत्येकाला लागली आहे. ठिकठिकाणी ढोलचा गजर कानी पडत आहे. तरूणांई मोठया उत्साहाने एकत्रित येऊन ढोल वाजविण्याचा सराव करत आहे. मग या आनंद उत्सावात मराठी कलाकारदेखील कसे मागे राहतील. नुकतीच बॉलीवुडमध्ये पदापर्ण करणारी मराठमोळी अभिनेत्री श्रुती मराठे देखील गणेश उत्सवाच्या तयारीला लागली असल्याचे दिसत आहे. ही अभिनेत्री मोठया दिमाखात ढोल वाजविण्याचा सराव करत आहे. याविषयी लोकमत सीएनएक्सशी बोलताना श्रुती म्हणते, आमचं कलावंत ढोलताशा पथक आहे. हे आमचे तिसरे वर्षे आहे. दरवर्षी या पथकात नवीन कलाकार सहभाग घेत असतात. गणपतीच्या दहा दिवसात आम्ही सर्व कलाकार खूप एन्जॉय करत असतो. आमच्या पथकाचा हा सराव पुणे येथे सुरू आहे. मला जसं जमेन तसे मी सराव करण्यास वेळ देते. अभी तो ढोल बजने शुरू हुआ है... असे म्हणत श्रुती म्हणते, पण यावर्षी देखील पूर्ण विसर्जन मिरवणुक ढोल वाजविणार हा आत्मविश्वास आहे.