Join us

श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 18:46 IST

"विराट कोहलीसोबत शूट करताना...", काय म्हणाली श्रुती मराठे?

भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीने (Virat Kohli) आजच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे सर्व क्रिकेटप्रेमी भावुक झाले आहेत. मराठी अभिनेत्री श्रुती मराठेला (Shruti Marathe) काही दिवसांपूर्वीच विराटसोबत जाहिरातीत झळकण्याची संधी मिळाली. याचा अनुभव तिने एका मुलाखतीत सांगितला. 

श्रुती म्हणाली, "विराट कोहलीसोबत शूट करताना खूप निर्बंध, खूप सुरक्षा आणि पटापट शूट करुन त्यांना जाऊ द्या असं वातावरण असेल असं मला वाटलं होतं. पण प्रत्यक्षात तो खूप चिल्ड आऊट होता. कृणाल पांड्या आणि विराट दोघंही होते. दोघंही इतके टाईमपास गप्पा मारत होते. म्हणजे एक वेळ तर अशीही होती की ते चक्क मीम्सवरही चर्चा करत होते.  मला असं वाटलं की अरे सोशल मीडियावर काय चालू आहे, कोणतं मीम मजेशीर आहे कोणतं व्हायरल झालं आहे यावर त्यांचं पण लक्ष असतं. हे बघून मला आश्चर्यच वाटलं. 

ऑन कॅमेरा बरेच रिटेक्स झाले. जाहिरात शूट करताना वेगवेगळ्या अँगलने शूट होत असतं त्यामुळे बऱ्याचदा रिटेक झाले. पण ते कोणीच कंटाळले नाहीत. इतक्या जाहिराती ते करत असतात त्यामुळे ते त्यात आता तरबेज झालेत. जेव्हा मला कळलं की विराट कोहलीसोबत जाहिरात आहे तेव्हा मला उलट याचं टेन्शन आलं होतं की आपल्याला काही काम असेल की नाही. मी स्वत: क्रिकेटप्रेमी आहे. भारत विरुद्ध दुसऱ्या देशाचा सामना असेल तेव्हा मी तो बघतेच."

टॅग्स :श्रुती मराठेविराट कोहलीजाहिरातमराठी अभिनेता