Join us
Daily Top 2Weekly Top 5

श्रृतीचं सौंदर्य पाहून चाहते झाले फिदा, म्हणाले ही तर अप्सरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2019 06:30 IST

श्रृतीने काही दिवंसापूर्वी तिचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यात ती खूपच सुंदर दिसतेय.

अभिनेत्री श्रृती मराठी सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर फॅन्ससह शेअर करत असते. तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रृती नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. श्रृतीने काही दिवंसापूर्वी तिचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यात ती खूपच सुंदर दिसतेय.  श्रृतीने या फोटोला कँडिड फोटो असे कॅप्शन देखील दिले आहे. या फोटोला लूक तिच्या चाहत्यांना खूपच भावला आहे. 

अभिनेत्री श्रृती मराठे आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मालिका असो वा सिनेमा दोनही माध्यमात श्रृतीने आपलं नाणं खणखणीत वाजवलं आहे. तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत. 

मराठीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही श्रृतीने आपल्या अभिनयाने फॅन्सची मने जिंकली आहेत. मराठीत प्रसिद्ध असलेल्या श्रृतीने तमिळ सिनेमा 'इंदिरा विजहा'ने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. श्रृतीने तमिळमधील 'प्रेम सूत्र', मराठीतील 'सनई चौघडे'सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. श्रृतीने विविध मराठी, तमिळ चित्रपटात काम केले आहे. साउथमध्ये ती 'श्रृती प्रकाश' या नावाने प्रसिद्ध आहे.  

टॅग्स :श्रुती मराठे