Join us

शिवानी सुर्वेचा हटके लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2016 15:17 IST

देवयानी या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली देवयानी म्हणजेच शिवानी सुर्वे. तुमच्यासाठी काय पण म्हणत या देवयानीने तिच्या चाहत्यांच्या मनावर ...

देवयानी या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली देवयानी म्हणजेच शिवानी सुर्वे. तुमच्यासाठी काय पण म्हणत या देवयानीने तिच्या चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. मालिकेतून आपण नेहमीच देवयानी पारंपारिक लूकमध्ये पाहायला मिळाली. पण सध्या देवयानी एकदम हटके लूकमध्ये सोशलमिडीयावर झळकत आहे. कपाळावर अर्धे केस व भिंतीच्या आडून तिच्या सुंदर अशा मनमोहक नजरेने क्लिक झालेला हा क्षण तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरेल हे मात्र नक्की. शिवानी सध्या जाना ना दिल से दूर या हिंदी मालिकेत काम करत आहे.