अशोक सराफ (Ashok Saraf) हे मराठी कलाविश्वातील महानायक आहेत. अशोक सराफ यांनी विविध चित्रपटात काम केलंय. कधी खलनायक, कधी रोमँटिक तर कधी विनोदी भूमिका करुन त्यांनी गेली अनेक दशकं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलंय. अशोक सराफ यांनी त्यांच्या कारकीर्दीत आजवर अनेक कलाकारांसोबत स्क्रीन शेअर केली. नुकत्याच एका मुलाखतीत अशोक सराफ यांनी अभिनेत्री रंजना देशमुख (Ranjana Deshmukh) यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला.
८०च्या दशकात अशोक सराफ आणि रंजना देशमुख यांची जोडी सुपरहिट ठरली होती. त्यांनी बऱ्याच सिनेमात एकत्र काम केले. अलिकडेच अशोक सराफ यांनी अमुक तमुक युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी रंजना देशमुख यांच्यासोबतच्या ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन केमिस्ट्रीवर भाष्य केलं. ते म्हणाले की,"रंजना खूप चांगली अभिनेत्री होती. खूप मेहनती होती. एखादी गोष्ट जमत नाही, म्हणजे काय, मी हे करून दाखवेनच. मला हे यायलाच पाहिजे. असं तिचे असायचे. ती मला फॉलो करायची, हे रंजनानेच मला सांगितलं होतं. मी तुला बघते आणि काम करते, असे तिने सांगितले होते. माझ्यासोबत काम केल्यानंतरचे तिच्या भूमिका बघा. पण, तिच्याकडे शिकण्याची खूप जिद्द होती. त्यामुळे ती ते करू शकली."
वर्कफ्रंटअशोक सराफ सध्या कलर्स मराठी वाहिनीवरील अशोक मा.मा. मालिकेत काम करताना दिसत आहेत. या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळते आहे. तसेच शेवटचे ते अशी ही जमवा जमवी या सिनेमात पाहायला मिळाले. यात त्यांच्यासोबत अभिनेत्री वंदना गुप्ते मुख्य भूमिकेत दिसणार आहे.