रईसमध्ये शुभम बनला छोटा शाहरुख
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2016 16:17 IST
प्रियांका लोंढे शाहरुख खानची भुमिका करायला कोणाला नाही आवडणार. आजही आपल्या या किंग ...
रईसमध्ये शुभम बनला छोटा शाहरुख
प्रियांका लोंढे शाहरुख खानची भुमिका करायला कोणाला नाही आवडणार. आजही आपल्या या किंग खान सोबत ऐका फ्रेममध्ये काम करण्यासाठी मोठे मोठे स्टार्स प्रतिक्षेत असतात. अशीच बॉलीवुडच्या या बादशाह सोबत काम करण्याची लॉटरी लागली आहे आपल्या मराठमोळ््या मुलाची. हाफ तिकीट या चित्रपटात मुख्य भुमिकेत दिसणारा शुभम मोरे शाहरुखच्या मोस्ट अवेटेड रईस या चित्रपटात शाहरुखच्या लहानपणीची भुमिका साकारणार आहे. या भुमिकेबद्दल शुभमने सीएनएक्सला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत सांगितले की, मला रईसमधील शाहरुख यान यांच्या लहानपणीच्या भुमिकेसाठी फोन आला. मला खरच खुप आनंद झाला. माझी शुटिंग कमप्लिट झाली आहे. ऐके दिवशी ते सेटवर मला भेटायला देखील आले होते. माझे सीन्स पाहुन त्यांनी मला तु खुप छान काम केले आहेस अशी कॉम्पलिमेंट सुद्धा दिली. आम्ही एकत्र फोटोज काढले. शाहरुख खान यांना चित्रपटांमध्येच पाहिले होते. पण प्रत्यक्षात जेव्हा भेटलो तेव्हा त्यांच्याशी बोलुन खुपच छान वाटले. आमचे एकत्र सीन्स जरी नसले तरी त्यांच्या लहानपणीचा रोल साकारण्याची संधी मला मिळाली यासाठी मी हॅपी आहे. आता रईस रिलीज झाल्यावरच आपल्याला या मराठमोळ््या छोट्या शाहरुखची रईसगिरी पडद्यावर पहायला मिळेल.