Join us

सईचा आमीरसोबत सेल्फी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2016 18:50 IST

            मराठी इंडस्ट्रीची बोल्ड अ‍ॅन्ड ब्युटिफुल अभिनेत्री सई ताम्हणकर हीच्या सोबत एक सेल्फी घेण्यासाठी ...

            मराठी इंडस्ट्रीची बोल्ड अ‍ॅन्ड ब्युटिफुल अभिनेत्री सई ताम्हणकर हीच्या सोबत एक सेल्फी घेण्यासाठी तिचे चाहते आसुसलेले असतात. आपणही सई सांबत एका कॅमेरॅत कैद व्हावे अशी स्वप्ने पाहणारे सईचे चाहते तर जगभरात आहेत. परंतू आपल्या सईला कोणासोबत सेल्फी काढण्यात इंटरेस्ट आहे हे तुम्हाला माहितीय का. बॉलीवुडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच आमीर खान याच्या तर अनेक तरुणी चाहत्या आहेत. मग आपली सई तरी कशी काय मागे राहणार बरं. सईने नूकताच एक आमीर सोबत काढलेला सेल्फी सोशल साईटवर शेअर केला आहे. सई आणि आमीर नूकतेच एका कार्यक्रमादरम्यान एकत्र आले होते. या संधीचे सोने करीत सईने आमीर सोबत कॅमेरामध्ये बंदिस्त होण्याचा चान्स घेतला. एवढेच नाही तर सईने महाराष्ट्राला दुष्काळविरहीत करुयात या मोहिमेसाठी काम करताना हम्बल वाटत आहे असे देखील म्हटले आहे. सई म्हणतीये, हम्बल टु बी पार्ट आॅफ धिस मोमेंट. सईच्या या पोस्टला टष्ट्वीटरवर तिच्या चाहत्यांकडुन बºयाच हिट्स मिळत आहेत. तर सईच्या या श्रमदानाचे सगळीकडेच कौतुक होत आहे. कलाकारांनी त्यांचे सामाजिक भान विसरलेले नाही हेच यातून दिसुन येते.