Join us
Daily Top 2Weekly Top 5

मराठमोळ्या नेहा पेंडसेच्या स्विमिंग पूलवरील बिकनीतील सेल्फी आणि व्हिडीओनं वाढवलं इंटरनेटचं तापमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 13:41 IST

Nehha Pendse: नेहा पेंडसेचा स्विमिंग पूलवरील हॉट फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नेहा पेंडसे (Nehha Pendse) अभिनयाव्यतिरिक्त आपल्या ग्लॅमरस अंदाजामुळे चर्चेत येत असते. आतादेखील ती बोल्ड अंदाजामुळे चर्चेत आली आहे. नुकतेच तिने इंस्टाग्रामवर आणि इंस्टास्टोरीवर बिकनीतील सेल्फी आणि व्हिडीओ शेअर केला आहे. तिच्या या पोस्ट्सने इंटरनेटवरील तापमान वाढवले आहे. हे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.

नेहा पेंडसे हिने इंस्टाग्रामवर बिकनीतील फोटो शेअर करून लिहिले की, पुढच्या वेळी कमी पोझ देईन आणि स्विमिंग जास्त करेन. तिच्या या फोटोला खूपच पसंती मिळताना दिसते आहे. या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

याशिवाय नेहाने इंस्टा स्टोरीवर स्विमिंग पूलवरील व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती वेगवेगळ्या अंदाजात पोझ देताना दिसते आहे. या व्हिडीओला खूपच पसंती मिळताना दिसते आहे.

नेहा पेंडसे भाभीजी घर पर है मालिकेत अनिता भाभीच्या भूमिकेत पाहायला मिळाली होती. मात्र नुकतेच तिने या मालिकेतून निरोप घेतला आहे. आता या मालिकेत तिची जागा विदिशा श्रीवास्तवने घेतली आहे. काही दिवसांपूर्वी या मालिकेचा नवीन प्रोमो लाँच करण्यात आला होता, ज्यामध्ये नेहा पेंडसेऐवजी विदिशा 'अनिता भाभी'च्या भूमिकेत दिसली होती. मात्र, नेहाने 'भाबी जी घर पर है' ही मालिका का सोडली, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. तिच्या आधी सौम्या टंडन अनिता भाभीची भूमिका साकारत होती.

टॅग्स :नेहा पेंडसेभाभीजी घर पर है