Join us
Daily Top 2Weekly Top 5

​सावनी रवींद्रची वुमन डे स्पेशल भेट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2018 10:28 IST

आपल्या सुरेख आवाजाने गायिका सावनी रविंद्र हिने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. तिने मराठी चित्रपटसृष्टीत एक से एक गाणी गायिली ...

आपल्या सुरेख आवाजाने गायिका सावनी रविंद्र हिने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. तिने मराठी चित्रपटसृष्टीत एक से एक गाणी गायिली आहेत. तिच्या प्रत्येक गाण्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे. आता, प्रेक्षकांची ही लाडकी गायिका सावनी रविंद्र वुमन डेचेच्या निमित्ताने रसिकांसाठी एक खास भेट घेऊन आली आहे. वुमन डेचे अौचित्त साधून अनेक सेलिब्रिटीज आपल्या परीने त्यांच्या फॅन्सना आपल्या कलाकृतीद्वारे काही ना काही भेट देऊन शुभेच्छा देऊ असतात. आपल्या गोड आवाजाने सर्वांना भुरळ घालणारी होणार सून मी या घरची फेम सावनी रवींद्र वुमन डे स्पेशल गाणे घेऊन आली आहे. सावनी ही खूप चांगली गायिका म्हणून आपल्या सर्वांच्याच परिचयाची आहे. शास्त्रीय संगीताचा भक्कम पाया आणि पाश्चिमात्य संगीताची उत्तम समज असे कमालीचे कॉम्बो सावनीच्या आवाजात आपल्याला ऐकायला मिळते. वुमन डे च्या दिवशी सावनी तिच्या महिला चाहत्यांसाठी एका नव्याकोऱ्या गाण्याची भेट घेऊन आली आहे. हे गाणे आपल्याला व्हिडिओ रूपात सुद्धा पाहायला मिळणार आहे. आपल्या फॅन्ससाठी व्हिडिओ साँगची भेट घेऊन सावनी लवकरच आपल्यासमोर येणार आहे. या व्हिडिओ साँग मध्ये आपल्याला सावनीचे अनेक अवतार पाहायला मिळतील. आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरून सावनीने नव्या गाण्याबद्दल सर्वांना सांगितलेले आहे.सावनीने या गाण्याद्वारे समाजात स्त्रियांबद्दलचा आदर आणि स्त्रियांची समाजाला असलेली गरज असा एक संदेश मांडलेला आहे. स्त्रियांबद्दल समाजातले भान वाढवणारे हे गाणे आहे असे सावनी सांगते. ८ मार्च म्हणजेच वुमन्स डेला हे गाणं सावनीच्या युट्यब चॅनलवर प्रदर्शित करण्यात आले. सावनीने तामिळ इंडस्ट्रीमध्ये खूप गाणी गायली आहेत. नुकतेच तिचे वेन्निलविन सालईगलिल हे गाणे प्रदर्शित झाले आहे. तिच्या या गाण्याला सोशलमीडियावर प्रचंड प्रमाणात लाइक्स मिळताना दिसत आहे. यापूर्वी गायिका सावनी रवींद्रने अनेक मराठी चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. सावनीने तिच्या सदाबहार अवाजाने रसिक प्रेक्षकांना देखील नेहमीच मंत्रमुग्ध केले आहे. तसेच छोटया पडदयावरदेखील तिच्या आवाजाची जादू ऐकण्यास मिळाली. Also Read : सावनी घेऊन येतेय स्वत:चे अ‍ॅप