Join us
Daily Top 2Weekly Top 5

संस्कृती बालगुडेने केले हॉट फोटोशूट, पाहा तिचा बोल्ड लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 18:42 IST

आपल्या या हॉट फोटोंच्या माध्यमातून तिने रसिकांच्या काळजाचा ठाव घेतला आहे.

अभिनेत्री संस्कृती बालगुडे सोशल मीडियावर बरीच अ‍ॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे हॉट आणि ग्लॅमरस फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. नेहमीच आपल्या या हॉट फोटोंच्या माध्यमातून तिने रसिकांच्या काळजाचा ठाव घेते.याच फोटोंच्या यादीत संस्कृतीच्या आणखी एका नव्या फोटोंची भर पडली आहे. संस्कृतीने नुकतेच सोशल मीडियावर एक फोटोशूट शेअर केले आहे. यात संस्कृती खूप हॉट आणि ग्लॅमरस दिसतेय.

काळ्या आणि लाल रंगाच्या वनपीसमध्ये संस्कृती खूपच हॉट दिसतेय. यात तिने विविध पोज दिल्याचे पाहायला मिळत आहे. तिच्या या फोटोवर तिच्या फॅन्सकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे.. तिचे सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टाईलने तिने रसिकांवर मोहिनी घातली आहे. 'सांगतो ऐका' या सिनेमानंतर निवडुंग, शिव्या, एफयु असे संस्कृतीचे विविध सिनेमा रुपेरी पडद्यावर झळकले आहेत.

संस्कृती शेवटची 'सर्व लाइन व्यस्त आहेत' या चित्रपटात दिसली होती.या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. या सिनेमात संस्कृती व्यतिरिक्त सिद्धार्थ जाधव, सौरभ गोखले, महेश मांजरेकर, स्मिता शेवाळे, हेमांगी कवी, नीथा शेट्टी-साळवी, राणी अग्रवाल, कमलाकर सातपुते, माधवी सोमण, प्रियंका मुणगेकर, संध्या कुटे, सतीश आगाशे, शिवाजी रेडकर, हितेश संपत आणि गौरव मोरे हे कलाकार मुख्य भूमिकेत होते.

टॅग्स :संस्कृती बालगुडे