Join us
Daily Top 2Weekly Top 5

संजय जाधवचा ‘ये रे ये रे पैसा’ ठरला सर्वोत्कृष्ठ सिनेमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 12:54 IST

2018च्या सुरूवातीला संजय जाधव दिग्दर्शित ‘ये रे ये रे पैसा’ रिलीज झाली आणि संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीसाठी शुभशकून झाला. ‘ये रे ये रे पैसा’ने बॉक्स ऑफिसवर पैशाचा पाऊस पाडला. आणि वर्षाची चांगली सुरूवात झाल्याचे संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीने म्हटले.

बॉलीवूड निर्माते वर्षाच्या पहिल्या शुक्रवारला खूप घाबरतात. पहिल्या शुक्रवारी फिल्म रिलीज झाली की, ती हिट होत नाही असा बॉलीवूडचा समज आहे. पण 2018च्या सुरूवातीला संजय जाधव दिग्दर्शित ‘ये रे ये रे पैसा’ रिलीज झाली आणि संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीसाठी शुभशकून झाला. ‘ये रे ये रे पैसा’ने बॉक्स ऑफिसवर पैशाचा पाऊस पाडला. आणि वर्षाची चांगली सुरूवात झाल्याचे संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीने म्हटले.

प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालेल्या ‘ये रे ये रे पैसा’ चित्रपटावर आता अवॉर्ड फंक्शन्समध्ये पुरस्कारांची बरसात होत आहे. ‘ये रे ये रे पैसा’ सिनेमाला झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ठ चित्रपट, सर्वोत्कृष्ठ दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ठ अभिनेत्याचे मानाचे पुरस्कार मिळाले आहेत.ह्याविषयी दिग्दर्शक संजय जाधव म्हणतात,“हे तीनही पुरस्कार मी माझ्या प्रेक्षकांना समर्पित करतो. त्यांनी आमच्या चित्रपटाला प्रेम दिलं, त्यामूळे आम्हांला मिळालेले हे यश आहे. समीक्षकांकडूनही प्रशंसाप्राप्त असलेल्या ह्या चित्रपटाला आता झी टॉकीजचा मानाचा पुरस्कार मिळाला आहे, मी त्यांचा आभारी आहे.”

‘ये रे ये रे पैसा’च्या ह्या घवघवीत यशानंतर आता सर्वांचे लक्ष संजय जाधव ह्यांच्या नुकत्याच घोषित झालेल्या ‘लकी’ ह्या चित्रपटाकडे लागले आहे. ह्या सिनेमाची स्टारकास्ट कोण असेल ह्याची सध्या फिल्म इंडस्ट्रीत उत्सुकता आहे. 'ये रे ये रे पैसा' हा  चित्रपट पद्मावत सारख्या चर्चित आणि बिग बजेट चित्रपटासमोर देखील चौथ्या आठवड्यात १२५ थिएटर्समध्ये यशस्वीरीत्या सुरू होता.पद्मावत सारखा बिग बजेट चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी होत असताना प्रेक्षक ये रे ये रे पैसाला देखील चांगले कलेक्शन मिळवून दिले होते.'ये रे ये रे पैसा'च्या टीमने हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी अमिताभ बच्चन यांची भेट घेतली होती आणि चित्रपटाच्या स्टारकास्टने बिग बीं सोबत क्वॉलिटी टाइम घालवला. 'ये रे ये रे पैसा' या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच या चित्रपटाविषयी प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता निर्माण झाली होती.