Join us
Daily Top 2Weekly Top 5

'संघर्षयोद्धा' मनोज जरांगे पाटील सिनेमाचा जबरदस्त टिझर रिलीज, 'या' तारखेला सिनेमा होणार प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 11:39 IST

मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर आधारीत 'संघर्षयोद्धा' सिनेमाचा पहिला टिझर रिलीज

गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर आधारीत 'संघर्षयोद्धा' सिनेमाची सर्वांना उत्सुकता होती. आंतरवाली सराटी भागात सिनेमाचं शुटींग सुरु होतं. बहुचर्चित 'संघर्षयोद्धा' सिनेमाचा पहिला टिझर भेटीला आलाय. 'संघर्षयोद्धा' सिनेमाच्या टिझरमधून मनोज जरांगे पाटील यांचा जीवनप्रवास उलगडताना दिसत आहे.

  मराठा समाजाच्या मुद्द्यावर गेले काही महिने महाराष्ट्र आणि राज्यातील राजकारण अक्षरशः ढवळून निघालं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी संघर्ष करत असलेले मनोज जरांगे पाटील यांची कहाणी मांडणारा 'संघर्षयोद्धा' चित्रपटाचा धमाकेदार टीजर लाँच करण्यात आला आहे. २६  एप्रिल रोजी "संघर्षयोद्धा" मनोज जरांगे पाटील हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

 

 शिवाजी दोलताडे यांनी 'संघर्षयोद्धा' सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी निभावली आहे. या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली आहे. या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हांडे,  माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर , सोमनाथ अवघडे , किशोर चौगुले , सिद्धेश्वर झाडबुके, यांच्या ही प्रमुख भूमिका आहेत. 

टॅग्स :मनोज जरांगे-पाटील