Join us  

म्हणून अशी ही आशिकी सिनेमातील ‘समझे क्या?’गाणं आहे हटके

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 8:00 AM

अकापेला हा गाण्याचा प्रकार आहे ज्यामध्ये कोणत्याही संगीत उपकरणांचा वापर केला जात नाही. म्हणजेच कोणत्याही इंस्ट्रुमेंट्सचा उपयोग न करता तोंडाच्या माध्यमातून गायलेलं गाणं म्हणजे अकापेला गाणं.

ठळक मुद्देअकापेला डुएट गाणं सोनू निगम आणि शनमुखप्रिया यांनी गायले आहे. सचिन पिळगांवकर यांनी हे गाणं कंपोझ केलं आहे

‘तेरी मेरी मेरी तेरी आशिकी’ या रोमँटिक गाण्यानंतर आशिकीचा मॅडनेस अनुभवण्यासाठी ‘अशी ही आशिकी’ घेऊन आलंय एक हटके अकापेला गाणं ‘समझे क्या?’ दिलखुलास आशिकी करणा-या स्वयम आणि अमरजच्या रिलेशनशिपवर एका पेक्षा एक गाणी तयार करण्यात आली आहेत. सुरुवातीला हेमलच्या ऐवजी ‘रकम्मा’ गाण्यातून रकम्माला शोधणारा स्वयम, त्यानंतर मेड फॉर इच अदर अशी जोडी असलेल्या स्वयम आणि अमरजाचं रोमँटिक गाण्यातला क्युट रोमान्स आणि आता आशिकीची नशा वाढवणारं अकापेला गाणं.

 अकापेला हा गाण्याचा प्रकार आहे ज्यामध्ये कोणत्याही संगीत उपकरणांचा वापर केला जात नाही. म्हणजेच कोणत्याही इंस्ट्रुमेंट्सचा उपयोग न करता तोंडाच्या माध्यमातून गायलेलं गाणं म्हणजे अकापेला गाणं. गाण्याच्या शब्दांसह गाण्याला लागणारे म्युझिक हे तोंडानेच दिले जाते, असे या सिनेमातील ‘समझे क्या?’ हे अकापेला डुएट गाणं सोनू निगम आणि शनमुखप्रिया यांनी गायले आहे. अकापेला गाण्याला सोनू-शनमुख यांचा आवाज आणि स्वयम आणि अमरजाची आशिकी या भन्नाट कॉम्बिनेशनची नशा आता प्रेक्षकांच्या मनावर होणार कारण हे हटके गाणं आता सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं आहे.

“पाय नाही नशेला या, मग ती डोक्यावर चढते का, झोपेला पंख नाही ना, मग तरी झोप उडते का, तू सांग ना...” असे या गाण्याचे बोल आहेत जे आपसूक आपलं लक्ष वेधून घेतात. सचिन पिळगांवकर यांनी हे गाणं कंपोझ केलं आहे तर अभिषेक खानकर यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. वोक्ट्रोनिका या अकापेला बँड यांनी हे गाणं अरेंज केलं आहे. अर्जुन नायर, अविनाश तिवारी, वर्षा इसवर आणि क्लाईड रॉड्रिग्स हे या बँडचे मेंबर्स आहेत.

 गुलशन कुमार प्रस्तुत, टी-सिरीजचे भूषण कुमार आणि क्रिशन कुमार निर्मित आणि सचिन पिळगांवकर दिग्दर्शित ‘अशी ही आशिकी’ सिनेमात अभिनय बेर्डे आणि हेमल इंगळे ही नवीन जोडी आशिकी करताना दिसणार आहे. तसेच या सिनेमाची निर्मिती मुव्हिंग पिक्चर्स आणि सुश्रिया चित्र यांनी देखील केली असून वजीर सिंह, जो राजन आणि सुप्रिया पिळगांवकर हे ही या सिनेमाचे निर्माते आहेत. ‘अशी ही आशिकी’ची जादू प्रेक्षकांना १ मार्चला अनुभवयाला मिळणार आहे.

 

टॅग्स :अभिनय बेर्डेसचिन पिळगांवकरसोनू निगम