'सैराट' फेम अरबाज शेखने गर्लफ्रेंड सिमरनशी निकाह करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. खरं तर अरबाजने तीन वर्षांपूर्वीच सिमरनशी निकाह करत वैवाहिक आयुष्याला सुरुवात केली आहे. पण, त्याने आता सोशल मीडियावर लग्नाचे फोटो पोस्ट केले. या फोटोंवर कमेंट करत चाहते आणि सेलिब्रिटींनी अरबाज आणि सिमरनला शुभेच्छा दिल्या. पण, काहींनी अरबाजला ट्रोलही केलं. त्या ट्रोलर्सला आता अभिनेत्याने उत्तर दिलं आहे.
अरबाजने शेअर केलेल्या लग्नाच्या फोटोंवर काहींनी "लव्ह जिहाद" असं म्हणत कमेंट केल्या होत्या. त्या ट्रोलर्सला महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत अरबाजने सडेतोड उत्तर दिलं आहे. अरबाज म्हणाला, "अनेकांनी कमेंट्स केल्या की याने मुस्लिम असूनही हिंदू मुलीशी लग्न केलं. पण लोकांना माहित नाहीये की ती सुद्धा मुस्लिमच आहे. काही लोकांना वाटलं सिमरन पंजाबी आहे, ती हिंदू आहे. पण खरं तर आम्ही आता जात आणि धर्मापलीकडे गेलो आहोत. आम्हाला या सगळ्यात अडकायचंच नाहीये. जन्माने मुस्लिम असलो तरी मनाने मराठी आहोत. माणूस म्हणून वागायला आमचं प्राधान्य आहे. या गोष्टी समजण्यासाठी आम्ही दोघेही तितकेच प्रगल्भ आहोत".
"माझ्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे. मी घरात शिवाजी महाराजांचा फोटो लावला तेव्हा माझ्या आईवडिलांनीही कधीच विरोध केला नाही. ते सुद्धा त्यांना मानतात. पण जेव्हा लोकांना समजलं की माझ्या घरात महाराजांचा फोटो आहे तेव्हा ते नको नको ते बोलले याचं खूप वाईट वाटतं. तर मी गळ्यात छत्रपती शिवाजी महारांचा लॉकेट घातलं होतं. हा लॉकेट घातलेला तो फोटो खूप व्हायरल झालेला. या फोटोवरही अनेकांनी नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या. मी छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो, त्यांचे विचार प्रेरणा देतात. पण फक्त आमचा धर्म वेगळा असल्याने आम्हाला विरोधाचा सामना करावा लागतो. घरच्यांचा कधीच विरोध नव्हता आणि नसतोही पण बाहेरचेच विरोध करतात", असंही अरबाज म्हणाला.
Web Summary : Arbaz Shaikh faced 'Love Jihad' accusations after posting wedding photos. He clarified his wife is also Muslim, emphasizing humanity over religious divides. He also expressed disappointment over criticism for honoring Shivaji Maharaj.
Web Summary : अरबाज शेख को शादी की तस्वीरें पोस्ट करने के बाद 'लव जिहाद' के आरोपों का सामना करना पड़ा। उन्होंने स्पष्ट किया कि उनकी पत्नी भी मुस्लिम है, और धार्मिक विभाजन से ऊपर मानवता पर जोर दिया। शिवाजी महाराज का सम्मान करने पर हुई आलोचना पर भी निराशा व्यक्त की।