Join us

सई ताम्हणकरला आतापर्यंत इतक्या जणांनी केलंय प्रपोझ, ब्रेकअपबद्दल अभिनेत्री म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 12:15 IST

Saie Tamhankar: सई ताम्हणकर तिच्या व्यावसायिक आयुष्यासोबत खासगी आयुष्यासाठी चर्चेत येत असते.

अभिनेत्री सई ताम्हणकर(Saie Tamhankar)ने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात घर केले आहे. तिने फक्त मराठी कलाविश्वातच नाही तर बॉलिवूडमध्येही आपले स्थान निर्माण केलं आहे. आज सई ताम्हणकरचा ३९वा वाढदिवस साजरा करते आहे. सई तिच्या व्यावसायिक आयुष्यासोबत खासगी आयुष्यासाठी चर्चेत येत असते. तिचे सतत कोणा ना कोणासोबत नाव जोडले जात असते. काही महिन्यांपूर्वी ती निर्माता अनिश जोगला डेट करत होती. पण मी ती वेगळी झाली. दरम्यान एका मुलाखतीत तिने तिला किती जणांनी प्रपोझ केलं, याबद्दल सांगितले. 

भावड्याची चावडी या शोमध्ये सई ताम्हणकरने तिला आतापर्यंत किती मुलांनी प्रपोझ केलं, याबद्दल सांगितलं होतं. ती म्हणाली होती की, मला खूप मुलांच्या डोळ्यात दिसत होतं की त्यांना मला प्रपोझ करायचं आहे. पण त्यांनी तसं बोलून दाखवलं नाही. कोणाची तशी हिंमत झाली नाही. का ते मला माहित नाही. लोकांना वाटतात तितके मला प्रपोज आलेले नाहीत.

ब्रेकअपबद्दल अभिनेत्री म्हणाली...

सई ताम्हणकर आणि अनिश जोग यांचे नाते खूप चर्चेत आले होते. साधारण दीड वर्षे त्यांनी एकमेकांना डेट केले. दोघे अनेकदा एकत्र फिरताना दिसले. पण अचानक एकेदिवशी सईने त्यांचे ब्रेकअप झाल्याचे जाहीर केले. तिने एका पोस्टमध्ये मी सिंगल आहे, हा माझा निर्णय आहे असं लिहून चाहत्यांना धक्का दिला होता. याआधी सईने अमेय गोसावीसोबत लग्न केले होते. पण त्यांचे नाते फार टिकू शकले नाही. दोन वर्षांच्या संसारानंतर ते विभक्त झाले.

वर्कफ्रंटसई ताम्हणकर शेवटची गुलकंद या सिनेमात झळकली. याशिवाय ती महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळते आहे. तसेच ती अलिकडेच इमरान हाश्मीसोबत ग्राउंड झिरो या सिनेमातही पाहायला मिळाली.

टॅग्स :सई ताम्हणकर