Join us  

'थोडीशी गेंड्याची कातडी...', बोल्डनेसवरुन होणाऱ्या सततच्या ट्रोलिंगवर सई ताम्हणकरचं स्पष्ट मत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2024 6:53 PM

सई मोजक्या भूमिका करते पण अगदी परफेक्ट करते. तिचा वेगळा चाहतावर्ग आहे.

मराठमोळी अभिनेत्रीसई ताम्हणकर तिच्या अभिनयामुळे नेहमीच सर्वांना प्रेमात पाडते. सई मोजक्या भूमिका करते पण अगदी परफेक्ट करते. तिचा वेगळा चाहतावर्ग आहे. सई ताम्हणकरने मराठीसोबतच हिंदीतही काम केलं आहे.  सई तिच्या बोल्डनेसपणामुळेही कायम चर्चेत येत असते.  इतकंच नाही तर तिच्या प्रत्येक पोस्टवर नेटकरी तिला ट्रोल करतात. या ट्रोलिंगवर आता सई ताम्हणकरने भाष्य केलं आहे.

सई ताम्हणकरने नुकतंच 'मुंबई तक'ला मुलाखत दिली. मराठी चित्रपटसृष्ट्रीत तू बोल्डनेस आणला आहेस. पण बोल्ड सीन्स केल्यामुळे किंवा बोल्ड भुमिका घेतल्यामुळे तुला ट्रोल केलं जातं. या ट्रोलिंगवर तु काय विचार करतेस, असा प्रश्न सईला विचारण्यात आला. यावर ती म्हणाली, ग्लॅमर, प्रसिद्धी आणि स्तुतीसह ट्रोलिंगही या प्रोफेशनचा घट्ट भाग आहे. मला असं वाटतं की त्याकडे दुर्लक्ष करावं. एखादी व्यक्ती जेव्हा प्रसिद्ध असते. चार चौकटीच्या बाहेर काम करू पाहते. तेव्हा तिला ट्रोल केलं जातं. कधी-कधी काही करत नाही, म्हणूनही ट्रोल केलं जात'. 

वैयक्तीक आयुष्यावर होणाऱ्या ट्रोलिंगवर ती म्हणाली, 'ट्रोलिंगचा मनावर परिणाम होते. पण, ट्रोलिंगवर आपली एनर्जी खर्च न करणे हाच चांगला उपाय आहे. आम्ही कुणाची तरी बहिण, मुलगी आणि ताई आहोत, हे लोक कमेंट करताना विसरतात. मला असं वाटतं की प्रोफेशमध्ये असताना थोडीशी गेंड्याची कातडी ठेवणं गरजेचं आहे.  ट्रोलिंग करुन ते तुमचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे जर तुम्ही तिकडे दुर्लक्ष करण्यात यशस्वी झालात, तर तुम्ही जिंकलात'. 

सईच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास,  ‘श्रीदेवी प्रसन्न’  चित्रपटातून सई प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.  या चित्रपटात सई अभिनेता सिद्धार्थ चांदेकरबरोबर पाहायला मिळतेय. यासोबतच  अभिनेत्री भूमी पेडणेकरच्या 'भक्षक' सिनेमात पाहायला मिळणार आहे. या सिनेमात ती  पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत आहे.  'भक्षक'हा एका सत्य घटनेवर आधारित चित्रपट आहे. हा चित्रपट 'नेटफ्लिक्स' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ९ फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. 

टॅग्स :सई ताम्हणकरसिनेमामराठी अभिनेतामराठी चित्रपटसोशल मीडिया