Join us

या मराठी अभिनेत्रीला या लूकमध्ये ओळखणे होतंय कठीण, ओळखा पाहू कोण आहे ही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 18:52 IST

या अभिनेत्रीने तिचा हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

ठळक मुद्देसईने शेअर केलेल्या या फोटोत तिने जीन्स आणि पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला आहे आणि गॉगल लावला आहे. हा फोटो काढताना ती मागे पाहाताना दिसत आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून सई ताम्हणकर नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर फॅन्ससह शेअर करत असते. तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत. सईने नुकताच तिचा एक फोटो पोस्ट केला आहे. 

सईने शेअर केलेल्या या फोटोत तिने जीन्स आणि पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला आहे आणि गॉगल लावला आहे. हा फोटो काढताना ती मागे पाहाताना दिसत आहे. या फोटोत सई इतकी वेगळी दिसत आहे की, तिला ओळखणे देखील कठीण जात आहे. सई या फोटोत खूपच छान दिसत असून हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. केवळ 12 तासांत 35 हजाराहून लोकांनी या फोटोला लाईक केले आहे. सई या लूकमध्ये खूपच छान दिसत असल्याचे तिचे चाहते सांगत आहेत. 

अदा, स्टाईल, लूक आणि तितकाच हॉट अंदाज यामुळे सई ताम्हणकर मराठी सिनेइंडस्ट्रीत ओळखली जाते. तिने आजवर दुनियादारी, बालक पालक यांसारख्या अनेक चित्रपटात दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. लवकरच ती लक्ष्मण उतेकर यांच्या मिमी सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात क्रिती सनॉन, पंकज त्रिपाठी यांच्या मुख्य भूमिका आहेत. दमदार भूमिका साकारणारी सई तितकीच स्टायलिश आहे. तिच्या स्टाईल स्टेटमेंटची चर्चा नेहमीच तिच्या चाहत्यांमध्ये रंगते. 

टॅग्स :सई ताम्हणकर