Join us

सईचा हा स्टनिंग आणि ग्लॅमरस अंदाज पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2019 18:39 IST

आपल्या अदा, स्टाईल, लूक आणि तितकाच हॉट अंदाज यामुळे सई ताम्हणकर रसिकांची लाडकी अभिनेत्री बनली आहे.

ठळक मुद्देसई ताम्हणकर मराठी रसिकांची दिलों की धडकन म्हणून ओळखली जाते. सईचा अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे

आपल्या अदा, स्टाईल, लूक आणि तितकाच हॉट अंदाज यामुळे सई ताम्हणकर रसिकांची लाडकी अभिनेत्री बनली आहे. सई सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. सई सोशल मीडियाच्या माध्यमातून ती फॅन्सच्या नेहमीच संपर्कात असते. फोटो आणि व्हिडीओ ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. सई ताम्हणकर मराठी रसिकांची दिलों की धडकन म्हणून ओळखली जाते.

 सईने इन्स्टाग्रामवर एक ग्लॅमरस फोटो शेअर केला आहे. फोटोतला सईचा अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे.  या फोटोवर रसिकांच्या लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षावर होतोय. सईचे प्रत्येक अंदाज रसिकांना आवडतो त्यामुळे हा अंदाजही रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. तिचा बोल्ड लूक आणि बिनधास्त अंदाज कुणालाही क्लीन बोल्ड करेल असाच पाहायला मिळतोय.

सई लवकरच वैभव तत्त्वादीसोबत 'पाँडेचेरी' सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात सईसह वैभव तत्त्ववादी, अमृता खानविलकर, महेश मांजरेकर, नीना कुलकर्णी झळकणार आहेत. या सिनेमाचे बरेचसे शूटिंग पाँडेचेरीमध्ये करण्यात आले आहे.सचिन कुंडलकर आणु तेजस मोडक यांनी या चित्रपटाची कथा लिहली असून हा एक कौटुंबिक विषयावर आधारित चित्रपट आहे.

याशिवाय सई ललित प्रभाकर आणि  पर्ण पेठेसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. सई पहिल्यांदाच ललित सोबत काम करताना दिसणार आहे. सईने आजवर दुनियादारी, बालक पालक यांसारख्या अनेक चित्रपटात दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. तिचे फॅन फॉलॉव्हिंग प्रचंड आहे. 

टॅग्स :सई ताम्हणकर