Join us

या मराठमोळ्या अभिनेत्रीच्या 'बोल्ड' सीनने तोडल्या होत्या सर्व मर्यादा, बोल्ड रूपात पाहून फुटला होता घाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2020 15:03 IST

सई ताम्हणकर सोबत राधिका आपटे हिने काम केले होते.या सिनेमात अनेक बोल्ड सीन्स चित्रीत करण्यात आले आहेत.

बोल्ड सीन, किसिंग हे आजच्या चित्रपटात सर्रास पाहायला मिळतं. रसिकांनाही यांत काहीही वावगं वाटत नाही. बोल्ड सीन आणि किसिंग सीनशिवाय चित्रपट पूर्णच होऊ शकत नाही. मात्र जशी भूमिका तशी कलाकार मेहनतही घेतात. मात्र कधी कधी भूमिकेसाठी कलाकारांना आपल्या मर्यादा ओलांडून काम करावे लागते. असा प्रयत्न अभिनेत्रीने सई ताम्हणकरनेही केला आणि तो जबरदस्त हिटही ठरला. सई ताम्हणकर मराठी रसिकांची दिलों की धडकन म्हणून ओळखली जाते.

सई ताम्हणकरने अनेक सिनेमात बोल्ड सीन देऊन धुमाकूळ घातला होता. जपून जपून पुढे धोका आहे,..म्हणत बिकनीमध्ये रूपेरी पडद्यावर झळकता सा-यांनाच आश्चर्यचकित केल होते. कदाचित मराठी चित्रपट सृष्टीत असा प्रयोग करणारी ती पहिली अभिनेत्री ठरली होती. पहिल्यांदाच या गोष्टी पलिकडे जाऊन मराठी सिनेमामध्ये  किसिंग सीन्स आणि बोल्ड सीन्सची कुणीही कल्पना करू शकत नव्हतं. मात्र काळ जसा पुढे गेला तशा चित्रपटसृष्टीत बदल होत गेले. हळूहळू या गोष्टी चित्रपटात दिसू लागल्या.

मराठीनंतर हिंदी सिनेमातही तिने आपली अदाकारी दाखवत सा-यांची वाहवा मिळवली. काही वर्षापूर्वी  हंटर हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. सई ताम्हणकर सोबत राधिका आपटे हिने काम केले होते.या सिनेमात अनेक बोल्ड सीन्स चित्रीत करण्यात आले आहेत. राधिका आपटे हिने यापूर्वीच काही सिनेमात अतिशय बोल्ड सीन देऊन वाहवा मिळवली असली तरी सईने देखील तशाच प्रकारे सीन देण्याचे धाडस दाखवले. या सिनेमातील तिच्या भूमिकेला सा-यांनीच पसंती दिली होती. 

टॅग्स :सई ताम्हणकरराधिका आपटे