सागरिका आणि झहीर खान देणार सरप्राईज?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2016 10:34 IST
मराठी इंडस्ट्रीत सनई चौघडे वाजण्यास सुरूवात झाली आहे. एकापाठोपाठ एक कलाकार विवाहबंधनात अडकताना दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतेच ...
सागरिका आणि झहीर खान देणार सरप्राईज?
मराठी इंडस्ट्रीत सनई चौघडे वाजण्यास सुरूवात झाली आहे. एकापाठोपाठ एक कलाकार विवाहबंधनात अडकताना दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतेच कलाकार कांदबरी कदम- अविनाश अरूण, चिराग पाटील- सना अंकोला, श्रुती मराठे- गौरव घाटणेकर, पल्लवी पाटील-संग्राम समेळ, मृण्मयी देशपांडे- स्वप्नील राव, आणि अतुला दुग्गल- सिद्धव नाचणे यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. मराठी सिनेसृष्टीत एक, दोन नाही तीन नाही तर तब्बल पाच जोड्या विवाहबंधनात अडकल्या आहेत. अजून एक गोष्ट म्हणजे कलाकारांबरोबरच नुकतेच युवराज सिंग या क्रिकेटरचंसुद्धा मोठ्या धुमधडाक्यात लग्न पार पाडलं. मुंबईसह त्यांनी गोव्यात देखील हिंदू पद्धतीने लग्न पार पाडलं. त्यावेळी बरीच कलाकार मंडळी तिकडे उपस्थितीत होती. मात्र या युवराजच्या लग्नामध्ये लक्ष वेधून घेतल ते क्रिकेटर झहीर खान आणि मराठमोळी अभिनेत्री सागरिका घाटगे हिने. युवराज सिंगच्या कित्येक फोटोमध्ये ही जोडी एकत्र पाहायला मिळाली आहे. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावरदेखील झळकले आहे. त्याच्या या फोटोमुळे त्याच्या अफेयरच्या चर्चादेखील रंगू लागल्या आहेत. त्याचबरोबर युवराजनंतर आता क्रिकेटर झहीर खानदेखील विवाहबंधनात अडकणार असल्याचे ऐकण्यास मिळत आहे. मात्र झहीरसोबत सागरिका घाटगे विवाहबंधनात अडकणार आहे का हे अजून गुलदस्त्यात आहे. मात्र सागरिका घाटगे आणि झहीर खान यांना एकत्रित पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सागिरका ही चक दे इंडिया या चित्रपटातून प्रकाशझोतात आली आहे. तसेच तिने प्रेमाची गोष्ट या मराठी चित्रपटातूनदेखील मराठी चित्रपटसृष्ट्रीत पदापर्ण केले होते. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता अतुल कुलकर्णी झळकला होता.