Join us
Daily Top 2Weekly Top 5

​रोहित राऊत करणार संगीत सम्राटचे सूत्रसंचालन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2017 17:07 IST

रोहित राऊतने अगदी लहान वयापासून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. सारेगमपा लिटल चॅम्पस या कार्यक्रमात तो स्पर्धक म्हणून झळकला होता. ...

रोहित राऊतने अगदी लहान वयापासून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. सारेगमपा लिटल चॅम्पस या कार्यक्रमात तो स्पर्धक म्हणून झळकला होता. त्याचा आवाज प्रेक्षकांना खूपच आवडला होती. याच कार्यक्रमामुळे तो प्रकाशझोतात आला. अखेरच्या पाच स्पर्धकांपर्यंत त्याने मजल मारली होती. त्यानंतर तो हिंदी सारेगमामध्येदेखील झळकला. या कार्यक्रमाद्वारेदेखील त्याने प्रेक्षकांची मने जिंकली. या दोन्ही रिअॅलिटी शोमुळे रोहितला मराठी इंडस्ट्रीत चांगलाच ब्रेक मिळाला. आज त्याने मराठी चित्रपटांमध्ये अनेक गाणी गायली आहेत. गायनामध्ये यश मिळाल्यानंतर रोहित राऊत आता सूत्रसंचालनाकडे वळला आहे. संगीत सम्राट हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या कार्यक्रमात रोहित प्रेक्षकांना सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे.सूत्रसंचालन करण्याची रोहितची ही पहिलीच वेळ असल्याने या कार्यक्रमासाठी तो सध्या चांगलाच एक्सायटेड आहे. या कार्यक्रमासाठी त्याने चित्रीकरण करायला सुरुवातदेखील केली असल्याचे म्हटले जात आहे. संगीत सम्राट या कार्यक्रमाद्वारे कोणत्याही पद्धतीने संगीताची निर्मिती करू शकणाऱ्या लोकांना एक व्यासपीठ मिळणार आहे आणि त्यातून एकाची निवड संगीत सम्राट म्हणून होणार आहे. या कार्यक्रमाची संकल्पना ही आताच्या रिअॅलिटी शोंपेक्षा खूपच वेगळी आहे.संगीत सम्राट या कार्यक्रमाच्या परीक्षकपदीदेखील दिग्दज हजेरी लावणार असल्याचे कळतेय. आदर्श शिंदेने गेल्या काही वर्षांत एक गायक म्हणून त्याची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याची अनेक गाणी प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली आहेत. तो या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका बजावणार असून त्याच्यासोबत मराठीतील एक आघाडीची अभिनेत्री परीक्षकाच्या खुर्चीत बसणार असल्याचे म्हटले जात आहे.