Join us
Daily Top 2Weekly Top 5

रोहित राऊत ठरला भारताचा पहिला आय पॉपस्टार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 17:36 IST

Rohit Raut : अ‍ॅमेझॉन एमक्स प्लेयरवरील आय पॉपस्टारच्या पहिल्या सीझनची सांगता झाली. यात रोहित राऊतला पहिल्यावहिल्या आय पॉपस्टारचा विजेता घोषित करण्यात आलं.

सहा अविस्मरणीय आठवडे आणि तब्बल ८५ ओरिजनल ट्रॅक्सनंतर देशभरात नव्या, स्वतंत्र पॉप आवाजांची लाट आणणाऱ्या अ‍ॅमेझॉन एमक्स प्लेयरवरील आय पॉपस्टारच्या पहिल्या सीझनची सांगता झाली. अंतिम फेरीची सुरुवात स्पर्धकांनी स्टेजवर जबरदस्त परफॉर्मन्स सादर करत झाली. टॉप २मध्ये टीम किंगचा रिषभ पांचाल आणि टीम पर्मिशचा रोहित राऊतचा समावेश होता. काही क्षणानंतर रोहित राऊतला पहिल्यावहिल्या आय पॉपस्टारचा विजेता घोषित करण्यात आलं आणि ७ लाख रुपयांचं बक्षीस प्रदान करण्यात आलं. रनर अप ठरलेल्या रिषभ पांचालला तीन लाखांचं बक्षीस मिळालं. दोघांना यावेळी केवळ बक्षिसंच नव्हे, तर देशभरात चाहतावर्गही मिळाला. 

यावेळी रोहित राऊत म्हणाला की, ''आय पॉपस्टारमधे मी कलाकार म्हणून स्वतःची वेगळी ओळख शोधायचा प्रयत्न केला आणि काही आठवड्यांनंतर आज मी विजेतेपदी उभा आहे. या विजेतेपदानं मला माझ्या कलेचा पाठपुरावा करण्यासाठी आत्मविश्वास दिला आहे. मी माझे मेंटॉर परमिश पाजी यांचा आभारी आहे. त्यांच्याशिवाय आणि अर्थातच माझ्यावर विश्वास दाखवणाऱ्या चाहत्यांशिवाय हे शक्य झालं नसतं. हा पुरस्कार मी आपल्या चौकटीबाहेर पडून गुणवत्ता सिद्ध करण्याची इच्छा असलेल्या प्रत्येक प्रादेशिक कलाकाराला अर्पण करतो. सरतेशेवटी अ‍ॅमेझॉन एमएक्स प्लेयरनं माझ्यासारख्या स्वतंत्र कलाकाराला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करत गुणवत्ता दर्शवण्याची आणि लाखो लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी दिल्याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो.''

रोहितच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करत परमिश वर्मा म्हणाले, ''या कलाकारांनी दाखवलेली पॅशन असामान्य आहे. ते इथे आले, तेव्हा आपलं अस्तित्व शोधत होते आणि हळूहळू त्यांनी आपली कला अधिक दमदारपणे देशभरातील प्रेक्षकांसमोर सादर करायला सुरुवात केली. पहिलावहिला आय पॉपस्टार माझ्या टीमचा आहे याचा मला अभिमान वाटतो. पहिल्या दिवसापासूनच रोहितने आपली गुणवत्ता दाखवायला सुरुवात केली होती आणि त्याला विकसित होताना, प्रयोग करताना, सर्वांना खिळवून ठेवताना पाहणं निव्वळ आनंददायी होती. आमच्यासाठी ही गोष्ट या शोच्या यशापेक्षाही मोठी आहे. हा भारत मोठ्या स्तरावर स्वतंत्र पॉपसाठी तयार असल्याचा पुरावा आहे.'' 

English
हिंदी सारांश
Web Title : Rohit Raut Crowned India's First I Popstar on MX Player

Web Summary : Rohit Raut won the first season of I Popstar on MX Player, receiving ₹7 lakhs. Rishabh Panchal was the runner-up. Rohit thanked his mentor, Parmish Verma, and dedicated his award to regional artists. Parmish Verma expressed pride and highlighted the show's success in showcasing independent pop talent.
टॅग्स :रोहित राऊत