Join us
Daily Top 2Weekly Top 5

"आस्ते कदम, आस्ते कदम...'; चिमुकल्याने अचानक सुरू केली शिवगर्जना, 'ऑटोग्राफ' देणारा रितेशही थांबला, अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 18:36 IST

Video: 'राजा शिवाजी' सिनेमाच्या प्रमोशननिमित्ताने रितेश महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरत आहे. एके ठिकाणी रितेश प्रमोशनला गेला असताना चिमुकल्याने शिवगर्जनेची घोषणा केली. त्यावेळी रितेशने केलेल्या कृतीने सर्वांचं मन जिंकलं.

सध्या 'राजा शिवाजी' या सिनेमामुळे अभिनेता रितेश देशमुख चांगलाच चर्चेत आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. 'राजा शिवाजी' सिनेमाच्या लेखन-दिग्दर्शनाची धुरा रितेशने सांभाळली आहे. इतकंच नव्हे याच सिनेमात रितेशने छत्रपती शिवरायांची भूमिकाही साकारली आहे. या सिनेमाच्या प्रमोशननिमित्ताने रितेश महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरत आहे. अशातच एके ठिकाणी रितेश प्रमोशनला गेला असताना चिमुकल्याने शिवगर्जनेची घोषणा केली. त्यावेळी रितेशने केलेल्या कृतीने सर्वांचं मन जिंकलं.

चिमुकल्याने अचानक सुरु केली शिवगर्जना अन्...

अभिनेता रितेश देशमुख  'राजा शिवाजी'चं प्रमोशन करण्यासाठी एका कार्यक्रमात उपस्थित होता. त्यावेळी तो एका कागदावर ऑटोग्राफ देत होता. अचानक रितेशच्या बाजूला असलेल्या लहान मुलाने शिवगर्जना देण्यास सुरुवात केली. ''आस्ते कदम....आस्ते कदम...आस्ते कदम... महाराज...'', अशा बुलंद आवाजत त्याने शिवगर्जनेची सुरुवात केली. त्यामुळे ऑटोग्राफ देण्यासाठी बसलेला रितेश उठून उभा राहिला. चिमुकल्याची शिवगर्जना होईपर्यंत रितेश शांतपणे उभा होता. शेवटी छत्रपती शिवाजी महाराज कीsss जय असं म्हणताच रितेशसह सर्वांनी शिवरायांचा जयघोष केला.




अशाप्रकारे या कार्यक्रमातील रितेशची छोटीशी कृती सर्वांचं मन जिंकतेय. अनेकांनी कमेंट्सच्या माध्यमातून रितेशचं कौतुक केलंय. याशिवाय रितेशने शांतपणे उभं राहून लहान मुलाला ज्या प्रकारे प्रोत्साहन दिलं त्याचंही सर्वजण कौतुक करत आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून अनेकांनी लाईक्स-कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

'राजा शिवाजी' सिनेमाबद्दल

रितेश विलासराव देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ हा भव्य ऐतिहासिक सिनेमा १ मे २०२६ मराठी आणि हिंदी भाषांमध्ये रिलीज झाला असून चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमात रितेश देशमुखसह संजय दत्त, अभिषेक बच्चन, जिनिलीया देशमुख, विद्या बालन, फरदीन खान, जितेंद्र जोशी, दिशा परदेशी हे मराठी आणि हिंदी कलाकार झळकत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Riteish Deshmukh's gesture wins hearts as child chants Shivaji's name.

Web Summary : During 'Raja Shivaji' promotions, Riteish Deshmukh paused signing autographs when a child passionately chanted Shivaji's name. Deshmukh stood respectfully, joining the crowd in Shivaji Maharaj's victory cry, winning hearts with his simple gesture.
टॅग्स :राजा शिवाजी चित्रपटरितेश देशमुखजेनेलिया डिसूजामराठी अभिनेतामराठी चित्रपटसेलिब्रिटी