देशमुख कुटुंब हे महाराष्ट्राचं लाडकं कुटुंब आहे. रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख हे दोघेही सिनेसृष्टीत कार्यरत आहेत. तर रितेशचे दोन्ही भाऊ हे राजकारणात सक्रिय आहेत. रितेशच्या आईसाहेब प्रगत शेती करतात. त्यांचे अनेक व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. फळभाज्यांपासून ते ड्रॅगन फ्रूटपर्यंत विविध उत्पादन त्या शेतात घेत असतात. आता त्यांनी शेतात कलिंगडचे पिक घेतले आहे. याचा व्हिडीओ रितेश देशमुखची वहिनी दिपशिखा देशमुख यांनी शेअर केला आहे.
या व्हिडीओत दिसतंय की दिपशिखा देशमुख आईसाहेबांसोबत शेतात गेल्या आहेत. ड्रॅगन फ्रूटच्या इथेच कलिंगडाची शेती केल्याचं रितेशच्या आईसाहेब व्हिडीओत सांगत आहेत. त्यानंतर शेतातील एक कलिंगड तोडून ते कापत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. देशमुखांच्या शेतातील हिरवागार कलिंगड कापल्यानंतर आतून लाल तांबूस दिसत आहे. कलिंगडाची चव घेतल्यानंतर दिपशिखा देशमुख "कलिंगड गोड आहे", अशी प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.
दिपशिखा देशमुख या एक निर्मात्या आहेत. अनेक बॉलिवूड सिनेमांची निर्मिती त्यांनी केली आहे. रितेश देशमुखचे बंधू धीरज देशमुख यांच्या त्या पत्नी आहेत. तर बॉलिवूड अभिनेता जॅकी भगनानीच्या दिपशिखा या बहीण आहेत.
Web Summary : Riteish Deshmukh's mother excels in farming, growing various produce, including red watermelons. A video shared by Deepshikha Deshmukh showcases the successful watermelon harvest, praised for its sweetness.
Web Summary : रितेश देशमुख की माँ खेती में उत्कृष्ट हैं, लाल तरबूज सहित विभिन्न उपज उगाती हैं। दीपशिखा देशमुख द्वारा साझा किए गए एक वीडियो में सफल तरबूज की फसल दिखाई गई, जिसकी मिठास के लिए प्रशंसा की गई।