Join us

करिना, कतरिनाची नाही तर रिंकूला साकारायची सावित्रीबाई फुलेंची भूमिका, वाचा काय म्हणाली आर्ची

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2020 13:10 IST

सैराट' सिनेमाने रिंकूला पैसा, प्रसिद्धी, मान-सन्मान पुरस्कार सारं काही दिलं.

सैराट' सिनेमाने रिंकूला पैसा, प्रसिद्धी, मान-सन्मान पुरस्कार सारं काही दिलं. रसिकांनी तर भरभरुन प्रेम दिलंच, शिवाय राष्ट्रीय पुरस्कारातही रिंकूनं बाजी मारली. 

अभिनेत्री रिंकू राजगुरु सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती त्यांच्यासोबत शेअर करत असते. तिचे विविध अंदाजातील आणि तिच्या चित्रपटाच्या संबंधीत असलेले फोटो ती यावर पोस्ट करत असते. तिच्या सगळ्याच फोटोंना तिच्या फॅन्सचा भरभरून प्रतिसाद मिळतो.

एका मुलाखती दरम्यान रिंकूला प्रश्न विचारण्यात आला की तुला कोणाच्या बायोपिकमध्ये काम करायला आवडले. यावर तिने उत्तर दिले सावित्री बाई फुले. मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी बरीच मेहनत घेतली आहे. त्यामुळे मला त्यांच्या बायोपिकमध्ये काम करायला आवडले असे रिंकू म्हणाली.

काही दिवसांपूर्वी रिंकूचा मेकअप हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमासाठी रिंकूने तब्बल ‘27 लाख रुपये घेतले होते. मानधनाची रक्कम पाहता रिंकू आज मराठीमधील सर्वाधिक महागडी अभिनेत्री बनली आहे.

टॅग्स :रिंकू राजगुरू