Join us
Daily Top 2Weekly Top 5

अथांग समुद्र, सूर्यास्ताचा नजारा अन् लाल साडीत रिंकू राजगुरूचा ग्लॅमरस अंदाज, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 15:36 IST

रिंकूनं 'लव्ह इज इन द एअर' असं म्हणत व्हिडीओ शेअर केला आहे.

मराठी मनोरंजनसृष्टीत सौंदर्य, सोज्वळपणा आणि अभिनयकौशल्य यांचा सुरेख संगम म्हणजे अभिनेत्री रिंकू राजगुरू.  आपल्या दमदार अभिनयाने आणि मोहक व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारी रिंकू राजगुरू पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिच्या अभिनयामुळे नव्हे, तर तिच्या सुंदर लूकमुळे. नुकतेच रिंकू राजगुरूनं शेअर केलेला एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. रिंकूने हा व्हिडीओ पोस्ट करताच तिच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेमाचे वारे वाहू लागले आहेत का? अशी चर्चा आता रंगली आहे.

रिंकूनं 'लव्ह इज इन द एअर' असं म्हणत व्हिडीओ शेअर केला आहे.  या व्हिडीओमध्ये रिंकू समुद्रकिनारी पळताना दिसतेय. सूर्यास्ताच्या प्रकाशात रिंकूने नेसलेली लाल रंगाची साडी तिच्या सौंदर्याला अधिकच खुलवत आहे. या व्हिडिओत तिच्या चेहऱ्यावरील हास्य बरेच काही सांगून जात आहे. 

रिंकूचा हा 'रोमँटिक अंदाज' पाहून चाहते घायाळ झाले आहेत. रिंकूने हा व्हिडीओ शेअर करताच अवघ्या काही मिनिटांत तो व्हायरल झाला. तिच्या अनेक कलाकार मित्रांनी यावर हार्ट इमोजी कमेंट केल्यात. तर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केलाय.

रिंकूच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, तिचा 'आशा' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर नुकताच तिचा 'पुन्हा एकदा साडे माडे तीन' हा सिनेमा रिलीज झाला आहे. यात अभिनेते अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Rinku Rajguru stuns in red saree at sunset; video goes viral.

Web Summary : Rinku Rajguru's new video, where she is seen in a red saree at the beach during sunset, has gone viral. Her romantic look has captivated fans, sparking dating rumors. She was recently seen in 'Punha Ekda Sade Made Teen'.
टॅग्स :रिंकू राजगुरू