Join us
Daily Top 2Weekly Top 5

डीपनेक ड्रेस अन् बोल्ड अंदाज, साध्याभोळ्या आर्चीचा कधीही न पाहिलेला हॉट अवतार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2024 13:58 IST

रेड कार्पेटवर दिसला कधी न पाहिलेला रिंकूचा बोल्ड अंदाज, डीपनेक ड्रेसमध्ये आर्चीचा जलवा

'सैराट'मधील आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू ही गुणी अभिनेत्री आहे. पहिल्याच सिनेमाने लोकप्रियता मिळवून दिल्यानंतर रिंकूने मागे वळून पाहिलं नाही. 'सैराट'नंतर रिंकू अनेक मराठी सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसली. नुकत्याच पार पडलेल्या फिल्मफेअर मराठी पुरस्कार सोहळ्याला रिंकूने हजेरी लावली होती. या सोहळ्यात तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला. 

फिल्मफेअरच्या रेड कार्पेटवर अनेक मराठी सेलिब्रिटींचा जलवा पाहायला मिळाला. रिंकूही फिल्मफेअरसाठी ग्लॅमरस अंदाजात आलेली पाहायला मिळाली. या खास पुरस्कार सोहळ्यासाठी तिने डीप नेक ड्रेस परिधान केला होता. लाँग गाऊनमध्ये रिंकूचा रेड कार्पेटवरील बोल्ड अवतार पाहून चाहतेही थक्क झाले. डीप नेक गाऊनवर रिंकूने खड्यांची ज्वेलरी परिधान केली होती. तिचा हॉट अंदाज पाहून सगळेच अवाक् झाले. रिंकूने पापाराझींना फोटोसाठी खास पोझही दिल्या. 

दरम्यान, 'सैराट'नंतर रिंकू 'कागर', 'आठवा रंग प्रेमाचा', 'मेकअप' या सिनेमांमध्ये दिसली. नागराज मंजुळेंच्या 'झुंड' सिनेमातही ती झळकली होती. यामध्ये तिने अमिताभ बच्चन यांच्याबरोबर स्क्रीन शेअर केली होती. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'झिम्मा २'मध्येही रिंकूने महत्त्वाची भूमिका साकारली. 

टॅग्स :रिंकू राजगुरूफिल्मफेअर अवॉर्डसेलिब्रिटी