लोकमत न्यूज नेटवर्कधडगाव : तालुक्यातील राजबर्डी गृप ग्रामपंचायतीत नुकतेच ग्रामसभा घेण्यात आली. या सभेत धावपटू रिंकी पावराचा सत्कार करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.सभेत अध्यक्षस्थानी सरपंच मनिषा पाडवी होत्या. यावेळी जि.प.सदस्य जान्या पाडवी, उपसरपंच मानसिंग वळवी, लुपिन फाऊंडेशनचे जोता पावरा, ग्रामविकास अधिकारी अतिष चव्हाण, वनपाल लांडगे, ग्राम सदस्य, रोजगार सेवक, अंगणवाडी सेविका व ग्रामस्थ उपस्थित होते. तर घरकूल तात्काळ शौचालयासह पूर्ण करणे, पंतप्रधान आवास योजना अंतर्गत कायमस्वरुपी प्रतिक्षा यादीतील संपूर्ण लाभार्थ्यांने कागदपत्र ग्रामपंचायतीकडे सादर करण्याचे आवाहनही करण्यात आले.
राजबर्डी ग्रामसभेत रिंकी पावराचा सत्काराचा ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 12:31 IST