Join us
Daily Top 2Weekly Top 5

अपात्र मराठी चित्रपटांचे पुनर्परिक्षण होणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2016 14:18 IST

    महामंडळाच्या विनंतीला सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचा सकारात्मक निर्णयअखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या नेतृत्वात एक ...

    महामंडळाच्या विनंतीला सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचा सकारात्मक निर्णयअखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या नेतृत्वात एक शिष्ट मंडळ नुकतेच सांस्कृतिक कार्य मंत्री श्री विनोद तावडे यांना भटले. या भेटीत मराठी सिने सृष्टीला भेडसावणाऱ्या अनेक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी मेघराज राजेभोसले आग्रही होते. आणि त्यांच्या मागणीला सांस्कृतिक मंत्री विनोद तावाडेंनीही तेवढाच सकारात्मक प्रतिसाद दिल्याने मराठी चित्र सृष्टीत चैतन्याचे वातावरण पसरले आहे.मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षांनी गेल्या 6 महिन्या पासून वारंवार विविध मागण्यांसाठी पाठपुरावा सुरु ठेवला होता, त्यात प्रामुख्याने खालील मागण्या होत्या।1. चित्रपट अनुदानातील अनेक त्रुटी दुरुस्त करण्याची मागणी होती, तिला मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला2. अनुदानासाठी अपात्र 60 पेक्षा अधिक सिनेमाबद्दल फेर विचार करण्याचे सूतोवाच श्री विनोद तावडे यांनी दिला।3. अनुदान योजनेसाठी अपात्र ठरलेल्या चित्रपटांपैकी सुरुवातीला 10 चित्रपटांचे पुनरपरिक्षण करून ते योग्य वाटल्यास इतर अपात्र चित्रपटांचेही पुनरपरिक्षण करणार4. सिनेसृष्टीतील व्यावसायिकांसाठी ठराविक ठिकाणी प्लॉट ची मागणी झाल्यास, तिथे आर्टिस्ट कॉलोनी साठी शासन प्रयत्न करणार5. चित्रपट महामंडळाच्या व चित्रपटाच्या विकासासाठी कार्य करणाऱ्या विविध पदाधीकाऱ्यांना महाराष्ट्रातील विविध शासकीय विश्राम गृहात मोफत राहण्याची सुविधा उपलब्ध करण्याचे आश्वासन मंत्री विनोद तावडे यांनी मान्य केले.6.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त होणाऱ्या भव्य अश्या "अखिल भारतीय मराठी चित्रपट महोत्सव" करिता योग्य ते सहकार्य करण्यास शासनाची तयारी.7. वयोवृद्ध कलावंतांना त्यांच्याच अकाऊंट मध्ये त्यांचे पेन्शन जमा करणार..पेन्शन ची रक्कम शासनाने वाढविली असून आता ₹ 2100 दिली जाणार.8. मराठी चित्रपट जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहचावे म्हणून, चित्रपट महामंडळासोबत मिळून विशेष योजना राबविणार.9. प्रोविडेन्ट फंड च्या धर्तीवर सर्व मराठी तंत्रज्ञ व कलाकारांना पेन्शन योजनेसाठी शासनही मोठा हातभार लावणार. चित्रपट महामंडळातर्फे याबद्दलचा आराखडा लवकरच शासनाला देणार.10.चित्रपट प्रसिद्धी व चित्रपट महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी होणाऱ्या कार्यक्रमाचा आराखडा मराठी चित्रपट महामंडळ शासनाला देणार.11. महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत असलेल्या महाराष्ट्रातील बहुसंख्य नाट्यगृह मराठी सिनेमा प्रदर्शनासाठी देण्याच्या महामंडळाच्या मागणीला सुद्धा विनोद तावडेंनी सकारात्मक प्रतिसाद दिलाविविध मागण्यांच्या प्रतीक्षेत असणारी मराठी चित्रपट महामंडळाच्या पदरात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर शासनाने सकारात्मक भूमिका घेऊन मराठी चित्रपट सृष्टीला पालक म्हणून सांभाळून मदतीचा हात दिला असल्याचे चित्र असून, मेघराज राजेभोसले व संचालक मंडळांच्या कढतर प्रयत्नांना मोठ्या प्रमाणावर यश आले आहे.. याबद्दल महामंडळाच्या अध्यक्षांनी संपूर्ण मराठी चित्रपट सृष्टीतर्फे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांचे आभार मानले.सदर शिष्टमंडळात चित्रपट महामंडळाच्या अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या सोबत, महामंडळाचे संचालक सतीश रणदिवे, पितांबर काळे, वर्षा उसगावकर, कार्यवाहक विजय खोचिकर, चैताली डोंगरे महामंडळाचे सल्लागार अभिनेते सुशांत शेलार उपस्थित होत्या. तसेच चित्रसृष्टीतील अनेक मान्यवरांमध्ये निलकांती पाटेकर, रामदास तांबे, जेष्ठ दिग्दर्शक रमेश साळगावकर, अजय राणे, दिग्दर्शक ज्ञानेश्वर आंगणे, दिग्दर्शक अजित साबळे, आदी उपस्थित होते..-दिपक चौधरी (जनसंपर्क प्रमुख, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ)