Join us

हॉट अँड बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असणाऱ्या रसिका सुनीलचा साडीतला फोटो होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2020 10:54 IST

नेहमीच तिचा ग्लॅमरस आणि मॉर्डन अंदाज सोशल मीडियावरील फॅन्सना घायाळ करत असतो.

कोणत्याही भूमिकेला न्याय देण्याचे कसब अभिनेत्री रसिका सुनील हिच्याकडे आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. नेहमीच तिचा ग्लॅमरस आणि मॉर्डन अंदाज सोशल मीडियावरील फॅन्सना घायाळ करत असतो. सोशल मीडियावर रसिका अॅक्टिव्ह असते. रसिकाचा सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत तिने साडी परिधान केली आहे.

एरव्ही मॉर्डन ड्रेसमध्ये दिसणारी रसिका पारंपरिक अंदाजामध्ये आणखीनच सुंदर दिसत आहे. यासोबत चेहऱ्यावरील स्मित हास्य रसिकांना अक्षरक्षः क्लीन बोल्ड करत आहे. या फोटोवर तिच्या फॅन्सकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे. 

रसिका सुनील बद्दल बोलायचे झाले तर छोट्या पडद्यावरील 'माझ्या नव-याची बायको' मालिकेत शनाया ही भूमिका साकारली होती. शनाया भूमिकेमुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली. मालिकेत तिची निगेटीव्ह भूमिका असली तरी आपल्या खास अंदाजात तिने ही भूमिका साकारली होती. तिच्या भूमिेकला रसिकांचीही भरघोस पसंती मिळाली होती.

 तिचा मालिकेतील अल्लडपणा रसिकांना चांगलाच भावला होता. मात्र पुढील शिक्षणासाठी शनाया अर्थात रसिकाने ही मालिका सोडली आणि ती अमेरिकेत गेली.

 

टॅग्स :रसिका सुनिल