राजकुमारचे नवे 'क्षितिज'...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2016 13:29 IST
राज चिंचणकर मराठी नाट्यसृष्टीत गाजलेल्या 'शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला' या नाटकात महत्त्वाची भूमिका रंगवल्यानंतर हरहुन्नरी कलावंत राजकुमार तांगडे ...
राजकुमारचे नवे 'क्षितिज'...!
राज चिंचणकर मराठी नाट्यसृष्टीत गाजलेल्या 'शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला' या नाटकात महत्त्वाची भूमिका रंगवल्यानंतर हरहुन्नरी कलावंत राजकुमार तांगडे नक्की काय करतोय याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना होती. आता राजकुमारनेच त्यावरचा पडदा बाजूला सारला असून, त्याने रंगभूमीवरून थेट मोठ्या पडद्यावर उडी घेतली आहे. ९ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या 'क्षितिज' या चित्रपटात तो रसिकांना दिसणार आहे. पण एवढे करूनच राजकुमार थांबलेला नाही; तर लवकरच तो एका चित्रपटाचे दिग्दर्शनही करणार आहे. अर्थात, त्याचे हे 'क्षितिज' विस्तारत असताना, त्याची रंगभूमीवरची टीम त्याला साथ देण्यास सज्ज आहेच.