Join us
Daily Top 2Weekly Top 5

Raja Shivaji: हाती भगवा ध्वज अन् डोळ्यांत स्वराज्याचं स्वप्न! रितेश देशमुख छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत, 'राजा शिवाजी' सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 15:42 IST

Raja Shivaji Movie First Poster: शिवजयंतीचं औचित्य साधून रितेश देशमुख आणि सिनेमाच्या टीमने हे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आणलं आहे. यात छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत रितेश देशमुखचा जबरदस्त लूक दिसतोय.

Riteish Deshmukh Movie Raja Shivaji First Poster: गेल्या अनेक दिवसांपासून रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमाची चांगलीच उत्सुकता होती. सिनेमाचं असणारं मोठं बजेट आणि तगडी स्टारकास्ट असल्याने हा सिनेमा भव्यदिव्य असणार यात शंका नाही. अशातच 'राजा शिवाजी' सिनेमाचं पहिलं पोस्टर आज भेटीला आलंय. शिवजयंतीचं औचित्य साधून रितेश देशमुख आणि सिनेमाच्या टीमने हे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आणलं आहे. यात छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत रितेश देशमुखचा जबरदस्त लूक दिसतोय.

पोस्टरमध्ये काय?

'राजा शिवाजी' सिनेमाच्या पोस्टरकडे पाहिल्यास दिसतं की, हातात भगवा ध्वज घेऊन रितेश देशमुख छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत पाहायला मिळतोय. हातात तलवार आणि कपाळावर टिळा असलेले छत्रपती शिवाजी महाराज पाहायला मिळत आहेत. आजूबाजूला युद्धाचं वातावरण दिसत असून डोळ्यांत स्वराज्याचं स्वप्न पाहणारे शिवराय लक्ष वेधून घेत आहेत. हे पोस्टर रिलीज होताच नेटकऱ्यांनी रितेशच्या लूकला पसंती दिली असून 'हर हर महादेव'च्या घोषणा केल्या आहेत.

आज तोच दिवस आहे, जेव्हा अंधाराला पहिल्यांदा प्रकाशाचं स्वप्न पडलं.. जेव्हा इतिहासानं नव्या भविष्याकडे पाउल उचललं... जेव्हा आपल्या मातीला मिळाला नवा स्वाभिमान.. शिवजयंतीच्या पावन निमित्ताने, Jio Studios आणि Mumbai Film Company सादर करीत आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्यगाथेवर आधारित #राजाशिवाजी या चित्रपटाचं पहिलं पोस्टर ! आपला राजा.. आपला अभिमान... दिग्दर्शक रितेश देशमुख घेऊन येत आहेत आपल्या राजाची गाथा - कधीही न पाहिलेल्या अभूतपूर्व रूपात!!!, असं कॅप्शन देऊन हे पोस्टर शेअर करण्यात आलंय.'राजा शिवाजी' सिनेमा १ मे २०२६ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात मराठीसह हिंदी कलाकारांची फौज आहे. सिनेमात रितेश देशमुख छत्रपती शिवरायांची प्रमुख भूमिका साकारत आहे. सिनेमात रितेशसह जिनिलीया देशमुख, जितेंद्र जोशी, सलमान खान, भाग्यश्री, संजय दत्त, फरदीन खान हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Ritesh Deshmukh as Shivaji: First poster of 'Raja Shivaji' released.

Web Summary : Ritesh Deshmukh embodies Shivaji Maharaj in 'Raja Shivaji'. The first poster, revealed on Shiv Jayanti, showcases Deshmukh with a saffron flag, sword, and a determined gaze, igniting excitement for the film's 2026 release. The film boasts a star-studded cast.
टॅग्स :छत्रपती शिवाजी महाराजमराठी चित्रपटमराठी अभिनेताजेनेलिया डिसूजासंजय दत्तसलमान खानरितेश देशमुख