Join us  

'आता निबंधात कमी मार्क्स मिळाले म्हणून..'; पुण्यातील पोर्शे अपघातावर अभिनेत्याची मार्मिक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 1:57 PM

पुण्यात कल्याणीनगर परिसरात झालेल्या अपघातानंतर अल्पवयीन चालकाला निबंध लिहिण्याची शिक्षा सुनावली. आता याच मुद्द्यावर मराठी अभिनेत्याने बोट ठेवलंय (hrishikesh joshi)

रविवारी पहाटे महाराष्ट्रातील लोकांना एका मोठ्या घटनेने हादरवलं. पुण्यातील कल्याणीनगर भागात पोर्शे कालच्या धडकेत दोन तरुण इंजिनीयर्सना त्यांचा जीव गमवावा लागला.  अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा हे दोघं या अपघातात गतप्राण झाले. बिल्डर विशाल अग्रवालच्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने हा अपघात केला. त्यावेळी त्याला शिक्षा म्हणून पुणेपोलिसांनी ३०० शब्दांचा निबंध लिहिण्याची कारवाई केली. यावरच मराठी अभिनेते हृषिकेश जोशी यांनी बोट ठेवलंय. 

हृषिकेश जोशी सोशल मीडियावर पोस्ट करुन लिहितात, "मग आता निबंधात कमी मार्क्स मिळाले म्हणून तुरुंगात घालायचा कायदा तरी आणा..." अशी सूचक पोस्ट हृषिकेश जोशींनी लिहिली आहे. हृषिकेश यांनी लिहिलेल्या या पोस्टचं अनेकांनी समर्थन केलंय. इतकंच नव्हे कमेंटमध्ये पोलिसांनी केलेल्या कारवाईवर टीका करुन न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलंय.

पुणे अपघात घटना

शनिवारी सुटीमुळे रात्री पार्टीकरून मध्यप्रदेशचे अभियंते अनिश अवधिया आणि अश्विनी कोष्टा हे घरी परतत होते. याच वेळी अग्रवालचा १७ वर्षीय मुलगा एका बड्या पबमधून पार्टीकरून आलिशान कारमधून सुसाट निघाला होता. कल्याणीनगरमध्ये वर्दळ असताना देखील त्याने वेग कमी न करता सुसाट कार दामटत अनिश व अश्विनी यांच्या दुचाकीला उडवले. या भीषण अपघातात दोघांचा ही जागीच मृत्यू झाला. स्थानिकांनी धाव घेत चालकाला पकडून चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले.

टॅग्स :पुणेड्रंक अँड ड्राइव्हपोलिस