Join us

पुजा सावंत ‘दादासाहेब फाळके पुरस्कार जाहिर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2018 09:42 IST

मराठीतील कलरफुल अभिनेत्री पूजा सावंतचा ‘लपाछपी’ हा सिनेमा चांगलाच गाजला होता. या सिनेमातील तिच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल अनेक आंतरराष्ट्रीय ...

मराठीतील कलरफुल अभिनेत्री पूजा सावंतचा ‘लपाछपी’ हा सिनेमा चांगलाच गाजला होता. या सिनेमातील तिच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय  पुरस्काराने घेतली. यात आता आणखीन एका सन्माननीय पुरस्काराचा समावेश झाला आहे. भारतीय चित्रपटाचे जनक दादा साहेब फाळके यांच्या १४९व्या पुण्यतिथी निम्मित ‘दादा साहेब फाळके सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्काराचा मान पूजा सावंतला मिळाला आहे.  येत्या २१ एप्रिल रोजी वांद्रे येथील सेंट अॅड्रयूज ऑडीटोरियममध्ये पुजाला हा पुरस्कार प्रधान करण्यात येईल. मराठी चित्रपटसृष्टीत दादासाहेब फाळके पुरस्कार हा अत्यंत मानाचा आणि मोलाचा मानला जातो. याआधीही ‘लपाछपी’ चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. जगभरातूनसुध्दा ‘लपाछपी’ आणि पुजा सावंतच्या अभिनयाची दखल घेतली आहे. ‘श्रावणक्वीन’ झाल्यानंतर पुजा सावंतने ‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. ‘क्षणभर विश्रांती’ या तिच्या पहिल्याच चित्रपटात तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. यानंतर झकास, सतरंगी रे, पोस्टर बॉईज , निळकंठ मास्टर, दगडी चाळ, भेटली तु पुन्हा, लपाछपी या चित्रपटात तिने आपले अभिनय कौशल्य दाखविले. पुजाच्या अभिनयावर आणि तिच्या सौंदर्यावर अनेक चाहते फिदा आहेत.'भेटली तू पुन्हा', 'दगडी चाळ', 'पोस्टर बॉईज' अशा सिनेमांमधून झळकलेली अभिनेत्री पूजा सावंतचा  स्विट अँड सिंपल लूकबरोबच बोल्ड अंदाजही रसिकांना भावतो.त्यामुळे तिच्या या लूकपेक्षा पूजा सावंतच्या हॉट अँड सेक्सी लूकचीच चर्चा जास्त होते.पूजाचा बॅकलेस साडीमधला बोल्ड लूक असो किंवा मग  'लपाछपी' सिनेमाच्यावेळी लंडन फिल्म फेस्टीव्हलमध्ये पूजाच्या सेक्सी अंदाज असो  तिचा बोल्ड लूक आणि बिनधास्त अंदाज कुणालाही क्लीन बोल्ड करेल असाच होता.'लपाछपी' सिनेमावेळी सिनेमापेक्षा पूजाच्या त्या लूकचीच जास्त चर्चा झाली होती.त्यामुळे आता पूजा सावंत कोणत्या कार्यक्रमात येते तेव्हा तिचा बोल्ड अवतार सगळ्यांनाच घायाळ करतो. मात्र तिचे हे सगळे हॉट अदा असलेले फोटो पाहून पूजा सावंतला काहीतरी हटके आणि वेगळे करण्याच्या विचारात असल्याचे जाणवते. तुर्तास पूजा सावंतचे निरनिराळे अंदाज सोशल मीडियावर हिट ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे.