रितेश देशमुखने त्याच्या अभिनयाचा ठसा बाॅलिवूडमध्ये उमटविलाच आहे. तसेच त्याने लय भारी या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत देखील पदापर्ण केले हाेते. लय भारी या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दर्शविली हाेती. या सिनेमानंतर रितेश काही मराठीत पुन्हा दिसला नाही. रितेशचे मराठमाेळे चाहते त्याच्या मराठी सिनेमाच्या प्रतिक्षेत नक्कीच असतील. काही दिवसातच आपल्याला रितेशचा मराठी अभिनय पुन्हा एकदा पडद्यावर दिसणार आहे. परंतू आता रितेश अभिनया बराेबरच एका मराठी चित्रपटाची निर्मिती करणार आहे. भा.रा भागवत यांच्या फास्टर फेणेने सर्वांनाच वेड लावले हाेते. याच फास्टर फेणेवर आधारीत एक मराठीत चित्रपट घेऊन रितेश येत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपाेतदार करणार आहे. तर या चित्रपटाच्या कथेवर सध्या क्षितीज पटवर्धन काम करीत असल्याचे त्याने लाेकमत सीएनएक्सशी बाेलताना सांगितले आहे.
रितेश करणार मराठी चित्रपटाची निर्मिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2016 15:03 IST