Join us

प्रियाचे दोन दगडु एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2016 16:25 IST

          टाईमपास या चित्रपटातील दगडुच्या कॅरेक्टरला खरतर कोणीच विसरु शकणार नाही. त्याचा एकंदरीतच हटके लुक, ...

          टाईमपास या चित्रपटातील दगडुच्या कॅरेक्टरला खरतर कोणीच विसरु शकणार नाही. त्याचा एकंदरीतच हटके लुक, भन्नाट-अफलातुन डागलॉगबाजी अन वेगळ््या धाटणीचा अभिनया या सर्व गोष्टींमुळे टाईमपास मधील दगडु आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. काहीच कालीवधीनंतर टाईमपासच्या यशामुळे दिग्दर्शक रवी जीधव यांनी टाईमपास -२ काढला यामध्ये प्राजक्ताची भुमिका आपल्या सोज्वळ प्रिया बापटने साकारली तर दगडुचे फेमस कॅरेक्टर प्रियदर्शन जाधव याने रंगविले. प्रिया आणि प्रियदर्शन यांची एकदमच डिफरंट जोडी आपल्याला या चित्रपटातून पहायला मिळाली. नूकतेच या सिनेमाला एक वर्ष पुर्ण झाले आहे. ज्यावेळी ही सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा प्रेक्षकांनी पहिल्याच दिवशी जबरदस्त ओपनिंग देऊन चित्रपट हाऊसफुल्ल केला. आता प्रिया बापटने याच आठवणींना उजाळा दिला आहे. तिने टाईमपास-२ ला एक वर्ष पुर्ण झाल्याने या चित्रपटाच्या आठवणींमध्ये रमुन जात सोशल साईट्सवर तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. एवढेच नाही तर तिने तिच्या आयुष्यातील रिअल दगडु अन रिल दगडु या दोघांसमवेतचा एक झक्कास  फोटो देखील अपलोड केला आहे.