Join us
Daily Top 2Weekly Top 5

अमेयमध्ये आडमुठेपणा आहे असं प्रिया का म्हणाली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2016 14:30 IST

​ आई-बाबा आणि साईबाबा शप्पथ कास्टिंग काऊच विथ अमेय अँड निपुणचा पाचवा वेब एपिसोड प्रदर्शित झाला आहे. महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री प्रिया बापट आज या शोमध्ये आली आहे. अमेय आणि निपुणने तिला बरेच प्रश्न विचारले आणि तिने त्याचे शांतपणे उत्तरं पण दिली.

             आई-बाबा आणि साईबाबा शप्पथ कास्टिंग काऊच विथ अमेय अँड निपुणचा पाचवा वेब एपिसोड प्रदर्शित झाला आहे. महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री प्रिया बापट आज या शोमध्ये आली आहे. अमेय आणि निपुणने तिला बरेच प्रश्न विचारले आणि तिने त्याचे शांतपणे उत्तरं पण दिली.

प्रियाचा ड्रेस, लिपस्टिक, झुंबर उर्फ झुमके या सर्व गोष्टीचे या दोघांनी कौतुक केले. पहिल्यांदाच या शोमध्ये कोणाचं तरी कौतुक करण्यात आलं आहे असं प्रिया बोलली पण ते पटलं बुवा!

सगळं काही मस्त, छान गप्पा चालल्या असताना नक्की प्रिया आणि अमेयमध्ये असं काय बिनसलं ज्यामुळे प्रिया अमेयला असं बोलली की, “अमेय तुझ्यात खूप आडमुठेपणा आहे आणि असं मला आवडत नाही.” नक्की काय वाजलं आहे त्यांच्यात खालील लिंकवर पाहू शकता-