Join us

प्रथमेश बनला दिग्दर्शक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2016 17:34 IST

टाइमपास, लालबागची राणी अशा अनेक चित्रपटातून अभिनेता प्रथमेश परब याने आपला अभिनय दाखविला आहे. त्याच्या या अभिनयाने तो प्रेक्षकांचा लाडका देखील बनला आहे. आता मात्र प्रथमेश अभिनयाबरोबरच दिग्दर्शकाच्या भूमिकेत देखील दिसणार आहे. नुकत्याच झालेल्या स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रथमेशने आपल्या चाहत्यांना खास गिफ्ट दिलं आहे.

टाइमपास, लालबागची राणी अशा अनेक  चित्रपटातून अभिनेता प्रथमेश परब याने आपला अभिनय दाखविला आहे. त्याच्या या अभिनयाने तो प्रेक्षकांचा लाडका देखील बनला आहे. आता मात्र प्रथमेश अभिनयाबरोबरच दिग्दर्शकाच्या भूमिकेत देखील दिसणार आहे. नुकत्याच झालेल्या स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रथमेशने आपल्या चाहत्यांना खास गिफ्ट दिलं आहे. प्रथमेशने स्वातंत्र्यदिनानिमित्त एक शॉर्ट फिल्मचे दिग्दर्शन केले आहे. या शॉर्ट फिल्ममध्ये त्याने सुंदर सामाजिक संदेश दिला आहे. या शॉर्ट फिल्मविषयी लोकमत सीएनएक्सशी बोलताना प्रथमेश म्हणाला, दिग्दर्शक बनण्याचा माझा हा सराव सुरू आहे. तसेच मला मार्गदर्शन करण्यासाठी माझ्यासोबत दोन ते तीन दिग्दर्शक देखील आहे. तसेच या शॉर्ट फिल्म मधून मला बरचं काही शिकायला मिळाले आहे. कोणती फ्रेम कुठे घ्यायची. त्याचबरोबर पडदयावर दिसत नसलो तरी पडदयावर काय दाखवायचं याच कंट्रोल माझ्याकडे आहे हे देखील  शिकायला मिळाल. या शॉर्ट फिल्मसाठी माझ्या टीमने देखील मला खूप मदत केली आहे.