Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रार्थना बेहेरेने शेअर केला थ्रोबॅक हॉट अँड सेक्सी फोटो, फॅन्स म्हणाले-ऐसी कातिल नजर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2020 14:39 IST

मालिका आणि रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाने रसिकांवर जादू केलीच आहे.

सध्या कोरोना व्हायरसमुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व कलाकार घरीच आहेत. सोशल मीडियावर ते सातत्याने आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे सोशल मीडियावर सक्रीय आहे आणि ती सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी संवाद साधत असते. तसेच ती सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते. प्रार्थनाने तिचे पाच वर्षांपूर्वीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत प्रार्थनाने काळा रंगाचे शॉर्ट टॉप घातले आहे. या फोटोत प्रार्थना हॉट दिसतेय.   प्रार्थनच्या फॅन्सनी तिच्या या थ्रोबॅक फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ऐसी कातिल नजर...मौसम भी बदलने लगा है, गॉर्जिअस, ब्युटीफूल अशा कमेंट्स दिल्या आहेत.

कॉफी आणि बरंच काही, मिस्टर एंड मिसेस सदाचारी, मितवा अशा विविध मराठी सिनेमातून आपल्या अभिनयाने प्रार्थनाने रसिकांची मनं जिंकली. प्रार्थनाने याआधी 'पवित्र रिश्ता' मालिकेतून छोटा पडदा गाजवला. त्यानंतर 'जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा' या मराठी सिनेमातून एंट्री मारत रसिकांची मनं जिंकली. मालिका आणि रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाने रसिकांवर जादू केलीच आहे.

प्रार्थनाचा पती अभिषेक जावकर हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध डिस्ट्रीब्युटर आहे. त्याने काही चित्रपटाचे दिग्दर्शनदेखील केले आहे. 'डब्बा एैस पैस', 'सॉल्ट आणि प्रेम' यांसारख्या मराठी चित्रपटांची त्याने सहनिर्मिती देखील केली आहे.

टॅग्स :प्रार्थना बेहरे