Join us
Daily Top 2Weekly Top 5

'ये लाल इश्क, ये मलाल इश्क ये ऐब इश्क, ये बैर इश्क!' म्हणत प्रार्थनाने शेअर केले स्टनिंग फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2021 13:41 IST

प्रार्थनाने आपल्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यावरुन म्हणजेच 'पवित्र रिश्ता' मालिकेतून केली.'

प्रार्थनाने आपल्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यावरुन म्हणजेच 'पवित्र रिश्ता' मालिकेतून केली.'जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा' या मराठी सिनेमातून एंट्री मारत रसिकांची मनं जिंकली.कॉफी आणि बरंच काही, मिस्टर एंड मिसेस सदाचारी, मितवा, मस्का अशा विविध मराठी सिनेमात काम केलं आहे.

प्रार्थना बेहरे सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. ती सोशल मीडियावर फोटो व व्हिडिओ शेअर करत असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना आगामी प्रोजेक्टबद्दल माहिती देत असते. प्रार्थना आपल्या वेगवेगळ्या फोटोशूटला घेऊन सोशल मीडियावर अलीकडे चर्चेत असते. प्रार्थनाने लाल रंगाच्या साडीत फोटोशूट करत सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. लाल रंगाच्या साडीत प्रार्थना खूपच सुंदर दिसते आहे. ये लाल इश्क, ये मलाल इश्क ये ऐब इश्क, ये बैर इश्क असं कॅप्शन तिने या फोटोसोबत दिलं आहे. नेहमीप्रमाणे प्रार्थनाचे हे फोटो पाहून चाहते फिदा झाले आहेत. काही वेळातच हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालंय.

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर प्रार्थना लवकरच छूमंतर या मराठी सिनेमात दिसणार आहे.यात तिच्यासोबत रिंकू राजगुरू, सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमाच्या काही सीन्सचे शूटिंग लंडनमध्ये झाले आहे.

टॅग्स :प्रार्थना बेहरे