Prarthana Behere On Priya Marathe: आपल्या अभिनयाने आणि मनमोहक हास्याने प्रेक्षकांना भुरळ घालणारी अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहरे. अभिनेत्री २००९ साली टीव्ही जगतातून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं.'पवित्र रिश्ता'ही तिच्या करिअरमधील पहिली मालिका होती. या मालिकेमुळे प्रार्थना घराघरात पोहोचली. याच मालिकेत प्रिया मराठे देखील महत्वाच्या भूमिकेत होती. मालिकेनंतर त्या एकमेकींच्या खूप घट्ट मैत्रीणी झाल्या. हे मैत्रीचं नातं त्यांनी कायम जपलं. गतवर्षी अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन झालं, तिच्या निधनामुळे सगळ्यांनाच धक्का बसला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मराठेच्या भावुक आठवणी शेअर केल्या आहेत.
अलिकडेच आरपारला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रिया मराठेबद्दल बोलताना प्रार्थनाला गहिवरून आलं. यादरम्यान, ती म्हणाली, "पवित्र रिश्तामध्ये काम करताना मी तिला अनेकदा म्हणायचे मी फिल्म केली की तुला त्यात कास्ट करेन. त्यानंतर एक संधी आली तेव्हा मी तिला संपर्क केला. तेव्हा तिला पहिल्यांदा कॅन्सर झाल्याचं समजलं, त्यावर उपचार झाले होते. ती बरी देखील झाली. मी तिला म्हटलं, मी सिनेमा दिग्दर्शित करतेय, त्यात तू काम कर. ती 'हो' म्हणाली. त्यानंतर तिला एक मालिका मिळाली, ती तिने केली. आम्ही एकत्र खूप स्वप्न बघितलेली. उद्या जरी मला जगातला मोठ्यातला मोठा पुरस्कार म्हणाला तर, तेवढी खुश नसेन, जेवढी मी एक वर्ष आधी होते. ज्यांना ज्यांना मी काहीतरी करावं असं वाटत होतं, ते सगळे गेले. माझा भाऊ, ज्याने मला सांभाळलं, तो सुद्धा सोडून गेला मला."
"मला प्रिया वारल्यानंतर खूप लोकांनी सांगितलं, आम्हाला तुमची मुलाखत घ्यायचीये. पण, मी नाही म्हटलं. कारण, तिचा आणि माझा बॉन्ड आम्हाला माहिती. मी लोकांना काय सांगू. मी आमचा अलिबागला काढलेला फोटो अपलोड केलेला. त्यावर मला खूप लाईक्स आले. खूप लोकांनी शेअर केला, कमेंट्स केल्या. मी म्हणते, हे जर तुम्ही ती जिवंत असताना केलं असतं, तर तिला खूप आनंद झाला असता. शेवटी-शेवटी ती मला म्हणायची, 'प्रार्थना मला लोक विसरलेत की काय. कोणाला माहितच नाही मी काय करते. कोणालाच नाही माहिती, माझे चाहतेपण, कोणालाच काही पडलेली नाहीये.' खूप आहे माझ्याकडे सांगायला, पण मला पब्लिसिटी नाही करायची." अशा भावना अभिनेत्रीने व्यक्त केल्या.
Web Summary : Prarthana Behere, in a recent interview, shared emotional memories of her friend, Priya Marathe, who passed away last year. They dreamed of working together, but Priya's illness prevented it. Prarthana wishes Priya received more recognition during her life.
Web Summary : प्रार्थना बेहेरे ने एक साक्षात्कार में अपनी दोस्त प्रिया मराठे, जिनका पिछले साल निधन हो गया, की यादों को साझा किया। उन्होंने साथ काम करने का सपना देखा था, लेकिन प्रिया की बीमारी ने रोक दिया। प्रार्थना चाहती हैं कि प्रिया को उनके जीवनकाल में अधिक पहचान मिले।