Join us

प्राजक्ता माळी पुण्यातील महिला कारागृहाला दिली भेट, शेअर केला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 11:53 IST

Prajakta Mali : प्राजक्ता माळी हिने पुण्यातील येरवडा कारागृहाला भेट दिली आणि तिथला व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला.

प्राजक्ता माळी (Prajakta Mali) मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिच्या मेहनतीच्या जोरावर सिनेइंडस्ट्रीत स्वतःचं स्थान निर्माण केलं. ती अभिनेत्रीसोबत उत्तम डान्सर आणि कवियित्रीदेखील आहे. प्राजक्ताने अलिकडेच फुलवंती सिनेमातून निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले. प्राजक्ता सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. नुकतीच तिने पुण्यातील येरवडा कारागृहाला भेट दिली आणि तिथला व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला.

प्राजक्ता माळी हिने पुण्यातील येरवडा कारागृहातील व्हिडीओ शेअर करत लिहिले की, अभिनेत्री प्राजक्ता माळीची पुणे - महिला कारागृह (सुधारणा- पुनर्वसन) सदिच्छा भेट..! सेवेचा सर्वोत्तम प्रकार म्हणजे कोणाच्यातरी मनःस्थिती उंचावणे. - श्री श्री रविशंकरजी. मीही माझ्या लहानशा क्षमतेत तसेच करण्याचा प्रयत्न केला. (एक छोटी ध्यान सत्र घेतली.) गुरुदेव म्हणतात, आपल्याला कधी कधी रुग्णालये, कारागृह, शेती या ठिकाणी जावे लागते, ज्यामुळे आपल्याला आठवते की आपले आयुष्य किती कृतज्ञतेने भरलेले आहे. अतिशय खरे. संधी दिल्याबद्दल माहेर महिलागृहाचे आभार.

वर्कफ्रंटप्राजक्ता माळी सध्या सोनी मराठी वाहिनीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमध्ये पाहायला मिळते आहे. यात ती सूत्रसंचालन करताना दिसत आहे. सिनेमाबद्दल सांगायचं तर शेवटची ती चिकी चिकी बुबूम बुम सिनेमात पाहायला मिळाली. यात हास्यजत्रेतील बरेच कलाकार मंडळी पाहायला मिळाले.

टॅग्स :प्राजक्ता माळीयेरवडा जेल