Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्राजक्ता माळीचा आवडता सहकलाकार कोण? ललित, गश्मीर की अंकुश? अभिनेत्रीच्या उत्तराने चाहते पडले कोड्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 14:00 IST

आपल्या निखळ सौंदर्याने आणि अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी.

आपल्या निखळ सौंदर्याने आणि अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेमुळे प्राजक्ता घराघरांत लोकप्रिय झाली. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. उत्तम अभिनयाबरोबर तिचं सूत्रसंचालन सुद्धा अनेकांना भावतं. 'पांडू', 'पावनखिंड', 'तीन अडकून सीताराम' आणि 'फुलवंती' अशा चित्रपटांमध्ये देखील तिने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तिनं मराठीमधील लोकप्रिय अभिनेत्यांसोबत काम केलं आहे. पण, तिचा आवडता अभिनेता कोण? चाहत्याच्या या प्रश्नावर अभिनेत्रीचं उत्तर ऐकून चाहते कोड्यात पडले आहेत.

प्राजक्ता सोशल मीडियावर कायम सक्रीय असते आणि तिच्याविषयीचे अपडेट्स चाहत्यांना देत असते.  प्राजक्ता माळी चाहत्यांसोबतही संवादही साधते. नुकतेच प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर आस्क मी एनिथिंग्स हे लाईव्ह सेशन घेतले, ज्यामध्ये तिने चाहत्यांच्या अनेक वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली. एका चाहत्याने प्राजक्ताला थेट विचारले, "गश्मीर महाजनी, अंकुश चौधरी आणि ललित प्रभाकर... यांपैकी तुझा आवडता सहकलाकार कोण?" या प्रश्नावर कोणत्याही एका अभिनेत्याचे नाव घेऊन इतरांना नाराज करण्याऐवजी प्राजक्ताने अत्यंत हुशारीने उत्तर दिले. तिने फक्त "तुम्हीच ओळखा" असे म्हणत गुगली टाकली.

प्राजक्ताने अंकुश चौधरी, गश्मीर महाजनी आणि ललित प्रभाकर या तिन्ही अभिनेत्यांसोबत स्क्रीन शेअर केली असून प्रेक्षकांनी प्रत्येक जोडीला पसंती दिली आहे. 'जुळून येती रेशीमगाठी' या लोकप्रिय मालिकेतील मेघना-आदित्यची (प्राजक्ता-ललित प्रभाकर) जोडी आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. 'लकडाऊन बी पॉझिटिव्ह' या चित्रपटात अंकुश चौधरीसोबतची तिची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती. 'फुलवंती' या ऐतिहासिक भव्य चित्रपटात गश्मीर महाजनी आणि प्राजक्ताची जोडी झळकली होती. 

प्राजक्ता केवळ एक अभिनेत्री नसून ती एक यशस्वी उद्योजिका देखील आहे. तिचा स्वतःचा दागिन्यांचा ब्रँड (Prajaktaraj) आणि कर्जतमध्ये एक आलिशान फार्महाऊस आहे. याशिवाय निर्माती म्हणूनही ती सक्रिय आहे. आगामी काळात तिचे तीन नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा प्राजक्ताची जादू पाहण्यासाठी तिचे चाहते आता कमालीचे उत्सुक आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Prajakta Mali's favorite co-star: A riddle for fans to solve.

Web Summary : Actress Prajakta Mali cleverly dodged a fan question about her favorite co-star among Gashmeer Mahajani, Ankush Choudhary, and Lalit Prabhakar, leaving fans guessing.
टॅग्स :प्राजक्ता माळी