Join us

अरेच्चा! जगातील सर्वात छोट्या तरूणीला भेटली प्राजक्ता माळी, शेअर केला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2020 17:38 IST

जगातील सर्वात छोट्या तरूणीसोबत प्राजक्ताने काढला फोटो आणि शेअर केला इंस्टाग्रामवर

मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर आपली छाप उमटविली आहे. सध्या ती बॉलिलँड या शोजसाठी जगभराची भ्रमंती करते आहे. या भ्रमंती दरम्यानचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकताच तिने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

प्राजक्ता माळी सोशल मीडियावर सक्रीय आहे. ती सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करत असते. नुकताच तिने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिच्यासोबत जगातील सर्वात छोटी तरूणी पहायला मिळते आहे. प्राजक्ताने हा फोटो शेअर करत लिहिले की, नागपूरच्या पटाकाला भेटून खूप भारी वाटलं. ज्योती आमगे, जगातील सर्वात लहान तरूणी. गिनीज बुकमध्ये तिची नोंद होऊन दहा वर्षे उलटली आहेत.  

ज्योती आमगेबद्दल सांगायचं तर नागपूरमध्ये वास्तव्यास असलेली ज्योती जगभरातील सर्वात उंची असणारी तरूणी आहे. तिच्या नावाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली आहे. तिचा जन्म १६ डिसेंबर, १९९३ साली झाला असून आता ती २७ वर्षांची आहे.

प्राजक्ताबद्दल सांगायचं तर छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ताच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ताने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली.

प्राजक्ता प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगना असून तिने अरंगेत्रम आणि विशारद पूर्ण केले आहे. यासह प्राजक्ता माळीला सांस्कृतिक विभागाकडून भरतनाट्यमसाठी शिष्यवृत्तीही देण्यात आली आहे.

टॅग्स :प्राजक्ता माळीइन्स्टाग्राम