Join us
Daily Top 2Weekly Top 5

तणाव, चिंता आणि ओव्हरथिंकिंगवर उपाय काय? प्राजक्ता माळीनं दिला मोलाचा सल्ला; म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 18:55 IST

प्राजक्ता माळीने सांगितला तणावमुक्त राहण्याचा मंत्र!

Prajakta Mali on Stress Anxiety Overthinking : प्राजक्ता माळी ही मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. प्राजक्ता ही तिच्या बोल्ड आणि बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. तिनं अनेक मालिका-चित्रपटांत काम केले. महाराष्ट्राची हास्यजत्रा या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुराही यशस्वीपणे सांभाळली आहे. ती कायम कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आता ती एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. 

प्राजक्ताचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. चाहत्यांना तिच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची इच्छा असते. प्राजक्ता माळीने इन्स्टाग्रामवर चाहत्यांच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरं दिली. यावेळी एकाने तिला "तणाव, चिंता आणि अतिविचारसाठी काय करू शकतो?" असा प्रश्न केला. यावर प्राजक्तानं त्याला ध्यान करण्याचा सल्ला दिला. 

याशिवाय आणखी एका चाहत्यानं तिला "जेव्हा मन खचतं, उदास वाटतं, तेव्हा काय करतेस?" असं विचारलं. यावर प्राजक्ता म्हणाली, "जेव्हा मला उदास वाटते, तेव्हा मी ध्यान करते. ध्यान करून मी स्वतःला पुन्हा ऊर्जावान आणि सावरण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर, कामामुळे माझा उत्साह टिकून राहतो".

प्राजक्ताच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती शेवटची 'फुलवंती' सिनेमात दिसली. २०२४ साली हा सिनेमा आला होता. तर मधल्या काळात ती 'देवखेळ' या वेबसीरिजमध्ये दिसली. आता प्राजक्ता जून नंतर एखाद्या प्रोजेक्टमध्ये दिसू शकते असाही तिने खुलासा केला आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Prajakta Mali's advice: How to cope with stress and overthinking.

Web Summary : Actress Prajakta Mali suggests meditation to manage stress, anxiety, and overthinking. She shared this advice while answering fan questions on Instagram, revealing that she meditates to regain energy when feeling low and stays motivated through work.
टॅग्स :प्राजक्ता माळी