Join us
Daily Top 2Weekly Top 5

पूजा लागली रेड कार्पेटच्या तयारीला

By admin | Updated: July 3, 2016 02:25 IST

मराठी इंडस्ट्रीची सुंदर अभिनेत्री पूजा सावंत हिला ‘लपाछपी’ या चित्रपटासाठी माद्रिद आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. हा पुरस्कार सोहळा २ ते ९ जुलैपर्यंत स्पेन

मराठी इंडस्ट्रीची सुंदर अभिनेत्री पूजा सावंत हिला ‘लपाछपी’ या चित्रपटासाठी माद्रिद आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. हा पुरस्कार सोहळा २ ते ९ जुलैपर्यंत स्पेन येथे आयोजित करण्यात आला आहे. या पुरस्कारासाठी पूजाला इन्व्हिटेशनदेखील आले आहे. पूजाने हा आनंद सोशल मीडियावर इन्व्हिटेशन कार्ड टाकून साजरादेखील केला आहे. पण आता या आंतरराष्ट्रीय पुरस्काराच्या रेड कार्पेटच्या तयारीला लागली असल्याचे पूजाने ‘लोकमत सीएनएक्स’ला सांगितले. पूजा म्हणाली, कोणत्याही पुरस्कार प्रीमियरसाठी मला तयार व्हायचे नाही तर आंतरराष्ट्रीय रेड कार्पेटवर चालायचे आहे. त्यामुळे मी आणि माझी डिझायनर श्रद्धा ओझा रेड कार्पेटच्या तयारीला लागलो आहोत. आमच्या डोक्यात सध्या खूप काही चालू आहे. रेड कार्पेटवर चालायचे म्हणून कधी वाटते गाऊन घालावे तर मराठी चित्रपटासाठी नामांकन मिळाल्यामुळे इंडो-वेस्टर्नचादेखील विचार चालू आहे. यासाठी सोशल मीडियावर चाहत्यांचे सजेशनदेखील मागितले आहे. तसेच रेड कार्पेटवर चालण्यासाठी भारतीय संस्कृती दाखविण्याचा प्रयत्न असल्यामुळे इंडो-वेस्टर्नलाच प्राधान्य देईन.