Join us
Daily Top 2Weekly Top 5

पूजा सावंतचा स्टनिंग लूक,सोशल मीडियावर व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2017 16:47 IST

अभिनेत्री पूजा सावंतने नुकताच सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत.या फोटोमध्ये तिचे  स्मोकी आय मेकअप पाहायला मिळत ...

अभिनेत्री पूजा सावंतने नुकताच सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत.या फोटोमध्ये तिचे  स्मोकी आय मेकअप पाहायला मिळत असून या लूकमध्ये तिचे सौदर्य  आणि हटके अंदाज लक्ष वेधून घेतोय.हिरव्या रंगाच्या ड्रेस तिने परिधान केला असून हातात ड्रेसला मॅच होईल असे क्लच घेतल्याचे पाहायला मिळतंय.तर ड्रेसच्या कलरला कॉन्ट्रास्ट मॅच असे लाल रंगाचे कानातले तिने घातल्यामुळे तिचा फुल ऑन स्टायलिश लूक पाहायला मिळतोय.तिचा हा फोटो पाहताच तिच्या चाहत्यांनी तिला खूप सारे कमेंटस आणि लाईक्स दिल्याचे पाहायला मिळत आहे.पूजाने फोटो शेअर करताच ३५ हजारहून अधिक लाईक्स आणि १६१हून अधिक कमेंट आल्याचे पाहायला मिळत आहे. काहींनी तर मराठीची स्टाईल ऑयकॉन म्हणूनही बोलवायला सुरूवात केली आहे.गेल्या काही महिन्यांमध्ये तिच्या फोटोंवर नजर टाकली तर तिचे असेच काहीसे घायाळ करणारे लूक्स पाहायला मिळतील.तिचा ड्रेसिंग सेन्स आणि तिचे सौदर्य यांमुळे पूजा सावंत चाहते तिच्या अभिनयाप्रमाणे स्टायलिश लूकचेही दिवाने झाल्याचे पाहायला मिळत आहे.cnxoldfiles/a>' सिनेमावेळी सिनेमापेक्षा पूजाच्या त्या लूकचीच जास्त चर्चा झाली होती.त्यामुळे आता पूजा सावंत कोणत्या कार्यक्रमात येते तेव्हा तिचा बोल्ड अवतार सगळ्यांनाच घायाळ करतो. मात्र तिचे हे सगळे हॉट अदा असलेले फोटो पाहून पूजा सावंतला काहीतरी हटके आणि वेगळे करण्याच्या विचारात असल्याचे जाणवते. तुर्तास पूजा सावंतचे निरनिराळे अंदाज सोशल मीडियावर हिट ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे.