Join us

दिवंगत गोपिनाथ मुंडेवरील पोवाडा व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2016 05:53 IST

​दिवंगत नेते गोपिनाथ मुंडे यांच्यावर आधारित ‘संघर्ष यात्रा’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत असून या चित्रपटातील नुकताच रिलीज करण्यात ...

दिवंगत नेते गोपिनाथ मुंडे यांच्यावर आधारित ‘संघर्ष यात्रा’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत असून या चित्रपटातील नुकताच रिलीज करण्यात आलेला जी जी रं हा पोवाडा लोकांना खूप आवडत आहे. म्हणूनच हा पोवाडा सोशल साईट्सवर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओ मध्ये रेकॉर्डिंग दरम्यानची काही दृष्य दाखविण्यात आली असून गाण्याचं पूर्ण स्वरूप आलेले नाही. पण संपूर्ण गाणं या व्हिडीओत दाखविण्यात आले आहे. आदर्श शिंदे यांनी आपल्या खड्या आवाजात पोवाडा गायला असून लोकांची भरभरून दाद मिळत आहे.